Amravati Lok sabha Election Result Update: अमरावतीमधून मोठी बातमी येत आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या पिछाडीवर आहेत. तिकीटासाठी भाजपात जाऊनही राणा यांना फायदा झाला नसल्याचे समोर येत आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नवनीत राणा यांना 341688 मते पडली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे (BALWANT WANKHADE) यांना 359492 मते मिळाली आहेत. राणा या 17804 मतांनी पिछाडीवर आहेत. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब (Dinesh Bub) यांना 53183 मते मिळाली आहेत. बच्चू कडूंच्या पक्षाने राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. या उमेदवाराने राणांची मते घेतली आहेत. यामुळे राणांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या या निर्णय महाविकास आघाडीला धक्का तर महायूतीला बळ देणारे ठरेल असा अंदाज वर्तविला जात होता. २०१९ मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी ५६ हजारांच्या जवळपास मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. परंतु यंदा अमरावतीमधून प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी स्वत: रिपब्लिकन सेनेतून उमेदवारी दाखल केल्याने वंचितने त्यांना पाठिंबा दिला. तसेच बाबासाहेबांचा नातू म्हणून जिल्ह्यातील आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत राहील अशी आशा आनंदराज आंबेडकरांना होती. परंतु आंबेडकरांना 9997 मते मिळाली आहेत.