अमरावती : कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. मराहाष्ट्रातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यांतील सलूनची दुकानेही बंद आहेत. अशात, अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी पती आमदार रवी राणा यांचे घरीच केशकर्तन (हेअरकट) केली आहे. याचा व्हिडिओदेखील त्यांनी फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी, हा व्हिडिओ शेअर करताना "आत्मनिर्भर होण्याचा अनेखा प्रयत्न", असे लिहिले आहे. नवनीत राणा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरेतर लॉकडाउनमुळे अनेकांवर घरीच केशकर्तन करण्याची वेळ आली आहे. अनेक जण केशकर्तन करणाऱ्यांना घरी बोलावूनही केशकर्तन करत आहेत.
गर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'
शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नवनीत राणा म्हणत आहेत, "मी माझ्या पतीला बऱ्याच वेळा सांगितले, की एखाद्या बारबरला बोलवा आणि केस कापून घ्या. मात्र वारंवार सांगूनही ते ऐकन नव्हते आणि तसेच अनेक बैठकांना जात होते. हे मला योग्य न वाटल्याने मी आज त्यांचे केस कापणार आहे. एवढेच नाही, तर 'मी पतीचे केस कापण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, केशकर्तनानंतर ते बैठकांसाठी जाऊ शकतात, की नाही हे पाहाव लागेल." असेही राणा यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 6 हजार जणांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेन्ट केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.
कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक