शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अमरावतीत घोटाळ्यांचा उच्चांक

By admin | Published: May 12, 2017 3:06 AM

नागपूर, अमरावती इत्यादी विभागांतील आदिवासी विभाग ‘संवेदनशील’ म्हणून गणले जातात. आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी

दीप्ती देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर, अमरावती इत्यादी विभागांतील आदिवासी विभाग ‘संवेदनशील’ म्हणून गणले जातात. आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी, उपासमार इत्यादी समस्यांनी या विभागांना विळखा घातला आहे. या समस्यांतून आदिवासी समाजाला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार पुरेशी आर्थिक मदत करण्यास कमी पडत आहे. मात्र, मिळत असलेल्या मदतीतही प्रकल्प अधिकारी आपले हात धुऊन घेत आहेत. २००४ ते २००९ या काळात अमरावती विभागात सुमारे १७ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला.अशिक्षित लोकांना पोटापुरते मिळावे, यासाठी राज्य सरकारने त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यास निधी उपलब्ध केला; परंतु अधिकाऱ्यांनी या निधीतील पैसे स्वत:च्या पदरात पाडले. घरकुल, दुभती जनावरे पुरवण्याच्या योजना व अन्य काही योजनांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने एम. जी. गायकवाड समितीने याबाबत निष्कर्ष न काढता चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आकडेवारीपेक्षाही अधिक घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकासमंत्री असताना, म्हणजेच २००४ ते २००९ या काळात आदिवासी कल्याणकारी योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याने विशेष तपास पथक नेमून याची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली. या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यानुसार एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेत अन्य चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती इत्यादी आदिवासी विभागांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी केली व उच्च न्यायालयात अहवालही सादर केला.अमरावती अतिरिक्त आदिवासी आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या धारणी, किनवट, अकोला आणि औरंगाबादच्या प्रकल्प अधिकाऱ्यांचीही या समितीने चौकशी केली. या चार प्रकल्पांमधून एकूण १६ कोटी ६४ लाख २१ हजार २२० रुपयांचा घोटाळा झाल्याचे गायकवाड समितीच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. तथापि, अनेक योजनांच्या कागदपत्रांअभावी समितीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपहार केला की नाही, याचा निष्कर्ष काढला नाही. त्यामुळे आणखी काही कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. २००४ ते २००९ या काळत किनवट प्रकल्प अधिकाऱ्यांनी ९ कोटी २८ लाख ५८ हजार २०४ रुपये हडपले. तर अतिसंवेदनशील विभाग असलेल्या धारणी प्रकल्प अधिकाऱ्याने ५ कोटी २८ लाख, ८२ हजार ४५५ रुपये खिशात घातले. अकोला १ कोटी, ३१ लाख ६४ हजार ०८७ व औरंगाबाद ७५ लाख १६ हजार ४७४ रुपयांचा घोटाळा करण्यात आला. (क्रमश:)खोटी कागदपत्रे दाखवून निधी हडपला-अमरावती विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी लोकांच्या रोजगारावरच गदा आणली. आदिवासी लोकांसाठी दुभती जनावरे पुरवठा योजना, शिलाई मशीन, भाजीचे दुकान, स्टेशनरी, सायकल व अन्य योजनांसाठी राज्य सरकारने अल्प निधी पुरवला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी यासंबंधी खोटी कागदपत्रे बनवून हाच निधी हडपल्याचे निदर्शनास आले आहे.