शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अमरावतीत ट्रकचालकाने १२ वाहने उडविली, तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 9:27 PM

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती), दि.20 -  अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. या घटना चांदूरबाजार ते खरवाडी या सहा कि.मी. लांबीच्या मार्गावरील बुधवारी सायंकाळी घडल्या. मृतांमध्ये किशोर इंगळे (४०), शिल्पा किशोर इंगळे (३८, पत्नी), शौर्य किशोर इंगळे (६, मुलगा, सर्व रा. काकडीपुरा, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, कसबा येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. घटनेनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. विविध अपघातानंतर ट्रकचालक व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले दोन क्लिनरही जखमी आहेत. वृत्त लिहिस्तोवर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते. पोलिसांचा मोठा गराळा ट्रकभोवती होता. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्र. एम.पी. ०९/एच.एफ. १५४२ हा मोर्शी मार्गावरुन चांदूरबाजारमार्गे अमरावतीकडे जनावरे वाहून नेत होता. चांदूरबाजार येथे बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. ट्रक थांबविण्याऐवजी चालकाने तो भरधाव वेगाने दामटला. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने नेला जात होता. पळण्याच्या मानसिकतेतील चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने कारला जोरदार धडक दिली. कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरुन येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकांना धडक देत खरवाडीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. हा घटनाक्रम घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. खारवाडी गावात भ्रमणध्वनीवरुन ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये अडविण्याचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक गाठलाच. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले. नागरिकांचा संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घटनास्थळी पोलीस कुमकही पोहोचली. संतप्त नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांच्या हप्तेखोर वृत्तीमुळेच असे ट्रक निष्पापांचे बळी घेतात, असा संताप यावेळी नागरिक जाहीरपणे व्यक्त करीत होते.