'ए भाई, तू जो कोण असशील...;' अमृता फडणवीस यांचं भाई जगतापांना थेट प्रत्युत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 09:52 AM2021-03-23T09:52:57+5:302021-03-23T09:53:32+5:30
...तेव्हा, यासंदर्भात फडवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. "अॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केली होती. माझी पत्नी त्या बँकेत नोकरी करते, म्हणून माझ्या सरकारची बदनामी करू शकता, असे कुणाला वाटत असेल, तर ते होणार नाही.
मुंबई: काँग्रेस नेते भाई जगताप (Bahi Jagtap) यांनी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट्स अॅक्सिस बँकेत (Axis bank) वळविल्यावरून माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भाई जगताप यांच्यावर पलटवार केला आहे. विशेष म्हणजे अमृता यांनी एकेरी उल्लेख करत जगतापांना प्रत्युत्तर दिले आहे. (Amruta Fadnavis rebuttal congress leader Bhai Jagtap)
यासंदर्भात, अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत, "ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!" असे म्हटले आहे.
परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर अमृता फडणवीसांचा 'शायरीतून निशाणा'
नेमके काय म्हणाले होते भाई जगताप?
मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा राजीनामा घेण्यात यावा, असे म्हटले आहे. याच मुद्द्यावरून, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच अमृता फडणवीस यांनी त्यांना अक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
काय आहे प्रकरण आणि काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’तून अॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उच्च पदावर कार्यरत असल्याने याचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी जोडला गेला होता. तेव्हा, यासंदर्भात फडवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. "अॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केली होती. माझी पत्नी त्या बँकेत नोकरी करते, म्हणून माझ्या सरकारची बदनामी करू शकता, असे कुणाला वाटत असेल तर ते होणार नाही. कारण माझी पत्नी कधीही सरकारी कार्यालयात आली नाही अथवा गेल्या पाच वर्षांत कुण्या सरकारी अधिकाऱ्याला भेटलेलीही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
"व्यवहार माझे, जबाबदार वाझे", अमृता फडणवीसांच्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे?