शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 8:01 AM

-योगेश बिडवई  मुंबई : लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ ...

-योगेश बिडवई मुंबई : लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत. 

एकीकडे शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी तर दुसरीकडे शहरात कांदा ८० ते १०० रुपये किलो झाल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. थोडक्यात यंदा प्रथमच ग्रामीण आणि शहरी भागात कांदा वांदा करणार आहे. 

राज्यातील ६० ते ७० मतदारसंघांत कांदा उत्पादन होते. तसेच दरवाढीमुळे शहरातील ५० ते ६० मतदारसंघांत हा महागाईचा मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे लोकसभेच्या साधारण १५ मतदारसंघांत सत्ताधारी युतीला फटका बसला होता. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने निर्यात खुली झाली. मात्र, त्यावर शुल्क कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा रोष कमी झाला नव्हता. त्यानंतर भाव हळूहळू वाढू लागले. मात्र, सप्टेंबरनंतर शेतकऱ्यांच्या कांदा संपू लागलाच भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात कांदा ८० ते १०० रुपये किलो झाला आहे. 

तणनाशकांवर मोठा खर्च

सतत ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे खरीप कांद्याचे (पोळ) यंदा उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे तण काढण्यासाठी लागणाऱ्या तणनाशकांवर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. 

१५ दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समितीत दोन टन कांदा विकला. एक एकर क्षेत्रावर लाल कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र, शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने ७० टक्के नुकसान झाले. प्रतवारीनुसार कांद्याला क्विंटलमागे ३,२००, २,६००, २,२०० आणि १,३०० रुपये असा भाव मिळाला. कांद्याचे ३८ हजार रुपये झाले. घरातील सर्वजण शेतात काम करत असल्याने मजुरी वाचली, तरीही लागवडीपासून सोलापूर बाजार समितीत कांदा नेण्याचा २५ हजार खर्च झाला. हातात केवळ १३ हजार आले.-सोमिनाथ घोळवे, कांदा उत्पादक, मुंडेवाडी (जि. बीड) 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४onionकांदाNashikनाशिकBeedबीड