मुंबई : घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिल मंडल (२८) या सुपरवायझरला २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. तर या प्रकरणी अन्य पाच जणांकडे चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.घाटकोपर पोलिसांनी मंडलला शनिवारी रात्री अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले होते. सुनील शितप याच्या नर्सिंगहोमच्या दुरुस्तीचे काम तो पाहत होता. शितप याला तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे.चार मजली सिद्धिसाई इमारत मंगळवारी सकाळी कोसळून १७ रहिवाशांचा मृत्यू झाला; तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरील शितपच्या मालकीच्या नर्सिंगहोमच्या बांधकामाची तोडफोड करण्यात येत होती. दुरुस्तीच्या कामाचे सुपरवायझर म्हणून मंडल काम पाहत होता. त्याच्या सूचनेनुसार इमारतीचे पिलर फोडण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली.
अनिल मंडलला २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:46 AM