शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे ‘अनाजीपंत’ आजही अस्तित्वात- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 4:03 AM

शिवनेरीवरून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ

जुन्नर : शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मातीचा कलश हाती घेत विरोधकांना संपवून नव्या स्वराज्यस्थापनेची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेचा बुधवारी प्रारंभ करण्यात आला. राजमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे पूजन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजविला. ‘‘शिवछत्रपतींच्या घराण्यामध्ये फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात आहेत,’’ अशी टीका या वेळी धनंजय मुंडे यांनी केली.शिवनेरीवरील अभिवादन सोहळ्यानंतर जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी युती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. धनंजय मुडे म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे. शिवाजीमहाराजांच्या स्मारकाची घोषणा हवेत विरली असून शिवछत्रपतींच्या नावाने आणलेल्या कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.’’प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्य शासनाने गेल्या ५ वर्षांत नुसत्या घोषणा केल्या. त्यामुळे राज्य कर्जबाजारी झाले असून कर वाढवून फडणवीस सरकारने लोकांच्या खिशावर घाऊक दरोडा टाकला आहे.’’ तर जनता पुरात, तर राज्यकर्ते प्रचारात मग्न आहेत. जनता महत्त्वाची की प्रचार महत्त्वाचा, असा रोकडा सवाल अजित पवार यांनी केला.शुभारंभाला उदयनराजे यांची दांडीया यात्रेच्या जाहिरातीत ‘उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार’ असे फलक लागले असतानाच यात्रेच्या शुभारंभालाच उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिल्याने उपस्थितांमध्ये चर्चा होती.पवारांच्या टीकेला महाजनांचे प्रत्युत्तरजामनेर (जळगाव) - नाशिकमध्ये पूरस्थिती असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तिरंगा घेऊन नाचत होते, अशी टीका पवार यांनी भाषणात केली. त्यावर नाशिक जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर असताना एनडीआरएफच्या टीमसोबत कमरे इतक्या पाण्यात फिरलो, अडकलेल्या नागरिकांना वाचविले. मला परिस्थितीचे गांभीर्य कळते. तुमच्यासारखा मी धरणात पाणी नाही तर काय करू... असे बोलत नाही, असे प्रत्युत्तर महाजन यांनी जामनेर येथे पत्रकार परिषदेत दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे