शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची परवडच

By admin | Published: September 25, 2016 2:16 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकांत अनेक परीक्षार्थींना अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. ही चूक नेमकी का झाली आहे याला कोण जबाबदार आहे, हे अद्यापही परीक्षा विभागाच्या लक्षात आलेले नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या सत्रात ‘कंट्रोल सिस्टम’ नावाचा पेपर असून या पेपरमध्येच विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालय तसेच विद्यापीठात विचारणा केली. परंतु कुठलेही ठोस उत्तर त्यांना मिळाले नाही. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा घोळ झाला असल्याचे मान्य केले. ‘कंट्रोल सिस्टम’ या पेपरमध्ये हे प्रमाण अधिक असून याचे कारण शोधण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.नागपूर विद्यापीठाने निकालांचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनुपस्थित किंवा अनुत्तीर्ण दाखविण्याचे प्रकार याअगोदरदेखील झाले आहेत. प्रत्येकवेळी अशी चूक तांत्रिक असल्याचेच उत्तर देण्यात येते. परंतु कंपनीवर कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेन्ट’ धोक्यातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन सुरू झाल्यामुळे निकालांचे घोळ कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात आता तर पेपर न तपासताच निकाल जाहीर होत असल्याचे दिसून येत आहे. अभियांत्रिकीच्या आठव्या सत्रातील वैकल्पिक विषयांचे पेपरच तपासण्यात आले नाही व यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. अशा स्थितीत विद्यापीठाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.अभियांत्रिकीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’ शाखेच्या सहाव्या सत्रातील ‘कॉम्प्युटर सिस्टम’ आणि आठव्या सत्रातील ‘रॅनडिम सिग्नल थेअरी आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन’ असे वैकल्पिक विषय आहेत.या पेपरची तपासणी होण्याआधीच विद्यापीठाने निकाल जाहीर केला. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे इलेक्टिव्ह विषय घेतले होते त्यांना गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण किंवा अनुपस्थित दाखवण्यात आले. या विषयातील सर्वच विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले याची महाविद्यालयांनी चौकशी केली असता तेव्हा ही बाब समोर आली. त्यानंतर या वैकल्पिक विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळालेली नाही.यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी म्हणाले, ही चूक महाविद्यालयांमुळेच झाली आहे. विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषय बदलले. परंतु याची माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाला दिली नाही. त्यामुळे अनेकांचे निकाल अनुपस्थित म्हणून आले.————-पुनर्मूल्यांकनाचाही गोंधळ सुरूचअभियांत्रिकीच्या अनेक परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. अद्याप पुनर्मूल्यांकनाचा निकाल हाती नाही आणि दुसरीकडे पुरवणी परीक्षा तोंडावर अशा कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला कमी गुण मिळाले अशी शंका आल्याने त्यांनी विद्यापीठाच्या प्रक्रियेप्रमाणे उत्तरपत्रिकांच्या ‘झेरॉक्स’ प्रतींसाठी अर्ज केले. या प्रतींच्या आधारावर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. परंतु तीन महिने उलटून गेल्यावरदेखील अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना निकालाचीच प्रतीक्षा आहे. मागील हिवाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालदेखील गेल्या पाच महिन्यांपासून मिळाले नसल्याची काही विद्यार्थ्यांची तक्रार आहे.