शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 05:40 IST

Anand Gurukul Residential Schools: आनंद गुरुकुल या निवासी शाळांची पटसंख्या प्रत्येकी २०० विद्यार्थी एवढी असेल.

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात ९वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ८ आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करीत आहे. त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असतील. अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे या आनंद गुरुकुलाचे उद्दिष्ट आहे.  आनंद गुरुकुल या निवासी शाळांची पटसंख्या प्रत्येकी २०० विद्यार्थी एवढी असेल. या शाळांमध्ये ९वी ते १२वीच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच २१व्या शतकाची गरज विचारात घेऊन क्रीडा, कला, शास्त्र व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इत्यादी विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा अभ्यास शिकविण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. 

विद्यार्थ्यांना या विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम शिकविल्यास त्यांना  उच्च शिक्षणाची गोडी निर्माण होईल. तसेच देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शासकीय विद्यानिकेतनांचा वापर?

राज्यातील ८ शैक्षणिक विभागांपैकी धुळे, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा आणि अमरावती या पाच जिल्ह्यांत शासकीय विद्यानिकेतने सुरू आहेत. याव्यतिरिक्त अन्य तीन शैक्षणिक विभागांत शासकीय विद्यानिकेतनाप्रमाणेच सुविधा आणि सुस्थितीत असलेल्या सुयोग्य शाळांची (प्रति विभाग एक शाळा) निवड अभ्यासगट आनंद गुरुकुलसाठी करील. 

नैपुण्य शाखांचा अहवाल सादर होणार 

क्रीडा, कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, भाषण कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इ. विशेष नैपुण्य शाखांचा समावेश अभ्यासक्रमात करण्याबाबतचा अहवाल उपसमिती अभ्यास गटाला सादर करेल.

प्रस्तावात काय असेल?

शासकीय विद्यानिकेतनांमधील वर्गखोल्या त्यांचे क्षेत्रफळ, उपलब्ध सुविधा, शाळांच्या जागांचे एकूण क्षेत्रफळ, भौतिक सुविधांची सद्य:स्थिती आणि निवासाच्या सुविधांची माहिती घेऊन या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक अतिरिक्त सुविधा, आवश्यक निधी इत्यादी बाबी विचारात घेऊन अभ्यासगट शासनाला  प्रस्ताव सादर करणार आहे. 

अभ्यासगट काय करणार?

- आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळांची स्थळनिश्चिती करणे  

- शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम तयार करणे 

- प्रवेश पद्धती निश्चित करणे, या शाळांची कार्यपद्धती, दिनदर्शिका ठरविणे 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEducationशिक्षण