शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

अन् व-हाडी नवरीला रेल्वेतच विसरले, पोलिसांच्या सतर्कतेमुळं नवरी पोहचली मंडपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:29 AM

मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले व-हाडी चक्क नवरीलाच रेल्वेत विसरले

मनीषा म्हात्रे  मुंबई : मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले व-हाडी चक्क नवरीलाच रेल्वेत विसरले. सर्व व-हाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नवरी गाडीतच राहिली. वºहाड्यांनी मंडप गाठल्यानंतर, नवरी सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधाशोध सुरू झाली, पण नवरी सापडलीच नाही.दुसरीकडे इगतपुरी स्थानकात उभ्या असलेल्या गाडीच्या शौचालयात एक मुलगी रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. इगतपुरी पोलिसांनी तिची चौकशी केली असता, सारा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर, पोलिसांनी तिला सुखरूप लग्नमंडपात पोहोचविले.नागपूरच्या गोपाळ पेठमध्ये राहणाऱ्या मिरगे यांची मुलगी रजनी हिचा रविवारी दुपारी १ वाजता नाशिक रोड येथे विवाह सोहळा होता. सकाळच्या एक्स्प्रेसने वºहाडी नवरीला घेऊन नागपूरहून नाशिककडे निघाले. सकाळी साडेआठच्या सुमारास गाडी नाशिक रोड स्थानकात आली. त्यापूर्वीच नवरी मुलगी शौचालयात गेली होती. स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात वºहाडी नवरीला शौचालयात सोडून निघाले. मंडपात पोहोचल्यानंतर नवरीच गायब असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.दरम्यान, शौचालयातून बाहेर आलेल्या नवरीला वºहाडी न दिसल्याने तिची तारांबळ उडाली. अनोळखी चेहरे पाहून तिही रडू लागली. अशातच इगतपुरी स्थानक येताच, रेल्वे पोलिसांकडून सामानाची झडती सुरू झाली. त्याच दरम्यान पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळुंखे यांचे लक्ष रजनीकडे गेले. त्यांनी विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रजनीने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी तत्काळ संपर्क साधून वºहाड्यांना मुलीची माहिती दिली.