मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाचे थैमान सुरूच असून, मागील ४८ दिवसांत मुंबईत एकूण ८५ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील काही ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती उत्पन्न झाली आहे. यातच उद्योजक आनंद महिंद्रांनी एक व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. (anand mahindra react on face mask)
आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ नये, करोना संसर्गावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून त्रिसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी चक्क त्याप्रमाणे शिक्षा देण्यास सुरुवात केलीय. याचाच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर शेअर केला आहे.
लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला
मी कधीच माझं मास्क विसरणार नाही
मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे तोंडावर मास्क घालण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे कोंबडा बनवून चालवत शिक्षा केली. मला हा व्हिडिओ सिग्नल अॅपवर मिळाला. मी बोर्डींग स्कूलमध्ये होतो, तेव्हा अशी शिक्षा ही सामान्य गोष्ट होती. थोडी मजेदार पण हे असं चालताना खूप थकायला व्हायचं. हे पाहून मी कधीच माझं मास्क विसरणार नाही, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईच्या मरिन ड्राइव्हर काही जणांना पोलिसांनी बेडुक उड्यांप्रमाणे चालण्यास सांगितल्याची शिक्षा केल्याचे आणि त्यांच्यावर एक पोलीस हवालदार लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, देशातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय, दिल्ली आणि बेंगळूरु शहरामध्येही करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील संसर्गदर २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्या खालोखाल पंजाब (८.८२ टक्के), छत्तीसगढ (८ टक्के), मध्य प्रदेश (७.८२ टक्के), तमिळनाडू (२.५० टक्के), कर्नाटक (२.४५ टक्के), गुजरात (२.२ टक्के), दिल्ली (२.०४ टक्के) या राज्यांमध्येही संसर्गदर एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे.