'अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित, अनैसर्गिक आघाडी कधीच चालू शकणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 02:24 PM2021-09-21T14:24:42+5:302021-09-21T14:27:44+5:30
Devendra Fadanvis News: शिवसेना नेते अनंत गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली.
मुंबई: माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पण, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समर्थन केलं जात आहे.
https://t.co/qBVphRJ7Hr
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2021
दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास मज्जाव #dhananjaymunde
दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एका विचाराची कधीच होऊ शकणार नाही, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनंत गीतेंनी केलेलं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही. मी तर पहिल्यापासून सांगतोय, ही अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
सत्तेसाठी तडजोड म्हणून राज्यात मविआ सरकार स्थापन झालं. शरद पवार हे आमचे नेते नाहीत. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे असं विधान अनंत गीते यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलं आहे. #NCP#Shivsenahttps://t.co/ULMvTdmm5B
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2021
'शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा'
अनंत गीतेंच्या विधानावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. 'संजय राऊत हे शिवसेनेचे की, राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करतात. पण मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे', असं मुनगंटीवार म्हणाले.