- आशिष दुबे, नागपूरनागपुरातील साल्पेकरबुवा यांच्या घरून चोरी झालेली ज्ञानेश्वरीची प्राचीन हस्तलिखित प्रतिलिपी अमेरिका येथील व्हर्जिनिया संग्रहालयात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही प्रतिलिपी परत आणण्यासाठी अजूनही कुठलाच प्रयत्न केला गेलेला नाही. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रतिलिपी पुरावशेष व बहुमूल्य कलाकृती अधिनियम १९७२ अन्वये नोंदणीकृत असून, तत्कालीन नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रशेखर गुप्त यांनी याची पुष्टी केली आहे. डॉ. गुप्त यांनी सांगितले की, विदेशी नागरिक डॉ. कैथरिन या नागपूर भ्रमणासाठी आल्या होत्या. त्यांनी आपल्यासोबत व्हर्जिनिया संग्रहालयातील ज्ञानेश्वरीच्या प्रतिलिपीचा फोटो आणला होता. तो फोटो बघून डॉ. गुप्त यांनी या प्रतिलिपीची नोंदणी मीच केली असल्याची पुष्टी केली. या संदर्भात त्यांनी ‘लोकमत’ला संपर्क करून सांगितले की, ‘संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेची रचना मराठीत केली होती. हे कार्य १३व्या शतकात झाले होते. यावेळी गीतेच्या प्रचार-प्रसारासाठी तत्कालीन शासन व काही लोकांनी त्याची प्रतिलिपी बनविली होती. १८व्या शतकात काही प्रतिलिपी नागपुरातही बनविण्यात आल्या होत्या. यातील एक प्रतिलिपी पंडित साल्पेकरबुवा यांना राजा जानोजी भोसले यांनी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने १९७५ पासून ऐतिहासिक संदर्भांना संरक्षित करणारे अधिनियम लागू केले. पुरावशेष व बहुमूल्य कलाकृतींना अधिनियमान्वये नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून मला नियुक्त केले होते. त्यामुळे या प्रतिलिपीची नोंदणी माझ्या हस्ते झाली.’तक्रार दाखल करण्यात आलीसाल्पेकरबुवा यांच्या घरून ही प्रतिलिपी हरविल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती की नाही, या संदर्भात डॉ. गुप्त यांनी साल्पेकर यांच्या कुटुंबीयांकडे विचारणा केली. तेव्हा ‘नोंदणी कार्यालयामध्ये प्रतिलिपी हरविल्याची तक्रार केली होती, परंतु कार्यालयाकडून कुठलीही कारवाई झाली नाही,’ असे या कुटुंबीयांनी सांगितले.अतिशय खास आहे ही प्रतिलिपीडॉ. गुप्त यांच्या सांगण्यानुसार ज्ञानेश्वरीच्या बऱ्याच प्रतिलिपी बनविण्यात आल्या होत्या. या प्रतिलिपीमध्ये साल्पेकरबुवा यांच्याकडे असलेली प्रतिलिपी अतिशय विशेष होती. ही प्रतिलिपी चित्रित असून, शेवटी पुष्पिका आहे. यात प्रतिलिपी कधी, कुणी तयार केली होती, याचा उल्लेख आहे.यात नागपूर शैलीतील चित्रकलेचे प्रमाणनागपूरची चित्रकलेची विशिष्ट शैली होती. याचे प्रमाणही ज्ञानेश्वरीच्या प्रतिलिपीतून मिळते. प्रतिलिपीवर आकर्षक सुंदर चित्र मुद्रित आहे. डॉ. गुप्त यांच्या सांगण्यानुसार नागपूरच्या चित्रशैलीला भोसल्यांच्या काळात संरक्षण मिळाले होते. ही प्रतिलिपी त्याचे प्रमाण आहे.
‘ज्ञानेश्वरी’ची प्राचीन प्रतिलिपी अमेरिकेत
By admin | Published: January 01, 2016 12:12 AM