शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

...आणि १२८ जणांचे वाचले प्राण

By admin | Published: March 05, 2016 2:29 AM

१२0 प्रवासी, आठ क्रू मेंबर्स या सर्वांना घेऊन विमान उतरत असतानाच अचानक टायर फुटून झालेला अपघात आणि त्याचवेळी प्रसंगावधान राखून वैमानिकाने उतरविलेले विमान

मुंबई : १२0 प्रवासी, आठ क्रू मेंबर्स या सर्वांना घेऊन विमान उतरत असतानाच अचानक टायर फुटून झालेला अपघात आणि त्याचवेळी प्रसंगावधान राखून वैमानिकाने उतरविलेले विमान... ही घटना एखाद्या हिंदी चित्रपट किंवा हॉलीवूड चित्रपटाला शोभेल अशीच आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने मात्र कोणीही जखमी झालेले नाही. विमानतळावर जेट एअरवेजचे विमान उतरत असताना गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमान सुरक्षित उतरले. दुर्घटना टळल्याने १२० प्रवासी आणि ८ कर्मचाऱ्यांचे प्राण बचावले. जेट एअरवेजचे ‘९ डब्ल्यू ३५४’ विमान दिल्लीहून मुंबईला आले. यामध्ये एकूण १२८ प्रवासी प्रवास करत होते. मुंबई विमानतळावर हे विमान लँड करत असताना अचानक या विमानाचा टायर फुटला. यात विमानाचे गिअर अचानक तुटल्यानेच अपघात झाला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान व्यवस्थितरीत्या विमानतळावर उतरविले. त्यामुळे अपघात टळला आणि सगळ्यांचे प्राण वाचले. त्यानंतर दहा तासांच्या रिकव्हरी आॅपरेशननंतर बिघडलेले विमान जेट एअरवेजच्या हँगरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करून पर्यायी रनवेवर विमान उतरवण्यात येत होते. या घटनेचा विमानसेवेवर थेट परिणाम झाल्याने बराच वेळ विमानांना उड्डाणासाठी उशीर झाला तर काही विमाने अहमदाबादकडे वळवण्यात आली होती. दुपारनंतर विमानसेवा पूर्ववत झाली. (प्रतिनिधी)