अकोले/ राजूर (जि. अहमदनगर) : नगर-नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर बारी घाटाच्या सुरुवातीच्या पहिल्या वळणावर शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजता संगमनेर-कसारा एस. टी. बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. बस खोल दरीच्या दिशेने ओढली गेली. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला अन् बसमधील ४७ प्रवासी बचावले. बारी घाटात काही महिन्यापूर्वी असाच अपघात झाला होता. तेव्हा चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला होता. शनिवारी त्याच घटनेची, तिथेच पुनरावृत्ती झाली. संगमनेर आगाराची संगमनेर-कसारा बस बारी घाटाच्या पहिल्या वळणावर आली असतानाच तिचा स्टेअरिंग रॉड तुटला. गाडी दीडशे फूट सरकत गेली आणि मोरीच्या कठड्याला अडकली. मात्र पुढचे चाक कठड्यापुढे तर मागील चाक कठड्यावर चढले होते. काही सेंटीमीटर गाडी पुढे गेली असती, तर खोल दरीत कोसळली असती. (तालुका प्रतिनिधी)
...अन् ४७ प्रवाशी बचावले
By admin | Published: February 06, 2017 1:09 AM