...आणि अजित पवार भावूक झाले..., शरद पवारांच्या उपस्थितीत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 04:59 PM2017-10-05T16:59:11+5:302017-10-05T17:00:04+5:30

... and Ajit Pawar became emotional ..., in the presence of Sharad Pawar | ...आणि अजित पवार भावूक झाले..., शरद पवारांच्या उपस्थितीत घडला प्रकार

...आणि अजित पवार भावूक झाले..., शरद पवारांच्या उपस्थितीत घडला प्रकार

Next

बारामती :  कोजागिरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा...आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला...असे बोलत असतानाच अजित पवार भाषण करताना काही  काळ स्तब्ध झाले...असे कधी होत नाही असे सांगत ते भावुक झाले...आाणि सभागृह देखील स्तब्ध झाले.  बारामती तालुक्यातील शालेय मुलींसाठी ३ हजार सायकल वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी हा प्रकार घडला. 

यावेळी महिला क्रिकेट विश्वचषक २०१७ स्पर्धेच्या उपविजेत्या भारतीय संघाच्या क्रिकेटपटु पुनम राऊत, स्मृती मंधाना, मोना मेश्राम यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले, विश्वचषक मुलींच्या गौरवाने इतर मुलींना प्रेरणा मिळाली. सायकल चळवळ उभी करा. त्यासाठी खंबीर भूमिका घ्या. आरोग्यासाठी ती उपयुक्त आहे. नेदरलँडच्या राजधानीमध्ये देशाचे पंतप्रधान कार्यालय, संसदेत, मंत्रिमंडळ हे सायकलचा वापर करतात. सगळे सायकलचा वापर करतात. 

...तो निर्णय योग्य होता

भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी महिला विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी  बजावली. क्रिकेट क्षेत्रात आपण जागतिक, भारत, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. मुलींचा संघ प्रोत्साहन करण्याचे धोरण स्वीकारले. ८, १० वर्षांपूर्वी मुलींचा संघ आपण मजबूत करू या हा विचार मांडला. इतर सहका-यांनी भलतच काही तरी, हे काही होणार नाही, असे सांगितलं. मात्र, आज महिला विश्वचषक स्पर्धेतील यश पाहिल्यानंतर तो निर्णय योग्य होता, हे त्यांना पटले असेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

Web Title: ... and Ajit Pawar became emotional ..., in the presence of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.