नांदेड : एप्रिल-मे महिन्याच्या ऐन दुष्काळात ज्यांनी ठाण्यात आश्रय दिला त्या सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी पुनर्भेट होताच या दुष्काळग्रस्तांना गहिवरून आले. नांदेडच्या दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील भाटु तांडा, शिकार तांडा या वस्त्यांना भेट दिली. याप्रसंगी शिंदे म्हणाले की, दोन महिने ही मंडळी ठाण्यात होती, त्यामुळे त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. या वस्तीला भेट देण्याचा निर्णय घेतला. या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे शिष्यवृत्ती योजना जाहीर केली होती, तिचे वाटप देखील करायचे होते. यंदा पाऊस चांगला झाला, जलयुक्त शिवारमुळेस्थानिक पातळीवर पाणीसाठा देखील चांगला झालाय, त्यामुळे तुमच्यावर पुन्हा विस्थापितहोण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
...आणि दुष्काळग्रस्तांना गहिवरून आले
By admin | Published: September 03, 2016 1:34 AM