शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अन् शुभमचे घराचे स्वप्न राहिले अधुरे

By admin | Published: October 16, 2014 9:56 PM

हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार : अनेक आठवणींनी माजगाव हळहळले

सावंतवाडी : इतरांचा प्राण वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या शुभमच्या आठवणीने अख्खे माजगाव हळहळत होते. 'आई, तू काम करू नकोस, मी चांगल्या नोकरीला लागलो आहे,' असे सांगून महिन्याभरापूर्वी सुट्टीवर आलेला शुभम घरातून निघून गेला. तो पुन्हा परत न येण्यासाठीच. शुभमने नविन घर बांधण्याकरिता कॉन्ट्रॅक्टरकडून घराचा आराखडा काढून घेतला होता. पण अचानक जाण्याने शुभमचे घराचे स्वप्नच अधुरे राहिले, हे सांगताना शुभमच्या घरच्या मंडळींना अश्रू आवरत नव्हते.शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण माजगाव येथे पार पडले. त्यानंतर तो बारावीपर्यंतचे शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात घेतले. त्यानंतर त्याने आॅनलाईन फॉर्म भरून नौदलाच्या विविध परीक्षा दिल्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर वीस महिन्यांपूर्वी नौदलाच्या सेवेत रूजू झाला. तेव्हा शुभमचे वय अवघे २0 वर्षे होते. अलिकडेच तो विशाखापट्टम येथे रूजू झाला होता. घरची हलाखीची परिस्थिती मात्र, आईने सर्व जबाबदारी स्वीकारत मुलगा कुठेतरी मोठ्या नोकरीला लागला पाहिजे, ही जिद्द मनाशी बाळगून त्याच्यावर संस्कार केले. त्यासाठी आईनेही यासाठी लहान मोठी कामेही केली. त्याचे चीज झाल्यासारखे तिला वाटत होते.वीस महिन्यांपूर्वी शुभम नौदलाच्या सेवेत रूजू झाला. त्यानंतर तो अधूनमधून घरी येत असे. शेवटचा घरी आला तो, चतुर्थीमध्ये. यावेळी त्याने आईला सांगितले की, आई तू काम करु नकोस, तुझा शुभम आता चांगल्या नोकरीला आहे. तरीही आई जिद्द सोडत नव्हती. अपार मेहनतीने शुभम नोकरीला लागल्याने तिला अभिमान होता. तसेच शुभमलाही आपल्याला आईने घडविले याचा अभिमान होता. त्याच्या मित्रासोबतच्या बोलण्यातून हे सतत जाणवत होते.शुभमने चतुर्थीला आल्यानंतर स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला सांगितले की, मला माझे जुने घर पाडून नवीन बांधायचे आहे. यासाठीचा आराखडा तयार करा, पुढच्या वेळी आल्यानंतर घर पाडून नविन बांधूया. पण शुभमचे हे स्वप्न आता अपुरे राहिले आहे. शुभमला काळ असा अचानक घेऊन जाईल, असे कोणाला वाटतही नव्हते. अभ्यासात हुशार असलेला शुभम घर आणि शाळा एवढ्यापुरताच मर्यादीत असे. कायम हसत चेहरा असल्यामुळे शुभमबद्दल अनेकांना अप्रुप असे.अन् शुभमच्या मृत्यूची बातमीच आलीविशाखापट्टमच्या किनारपट्टीला हुडहुड वादळाचा फटका बसेल, असे केंद्रीय हवामान खात्याने घटनेपूर्वी चार दिवस आधी जाहीर केले होते. या वादळाने अनेक जणाचे संसार उद्ध्वस्त झाले होते. किनारपट्टीवरच्या गावांमधील रस्तेही वाहून गेले होते तसेच झाडेही पडली होती. बचावकार्यासाठी जावे लागणार, याची कुणकुण शुभमला लागल्याने शुभमने रविवारी, ११ आॅक्टोबरला सकाळी आईला भ्रमणध्वनी केला. मला लोकांच्या मदतीसाठी जावे लागेल, बरीच झाडे पडली आहेत. मी आता एवढ्यात फोन करणार नाही म्हणून त्याने फोन केला होता. तोच त्याचा शेवटचा कॉल ठरला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजेच रात्री अडीच वाजता नौदलाच्या प्रशासनाने शुभमच्या मृत्यूची बातमी त्याच्या वडिलांना सांगितली.आणि सावंत कुटुंबीयांवर मोठा आघात झालागुरूवारी शुभमचा मृतदेह घरी आणल्यावर त्याच्या आईने हंबरडा फोडला. यामुळे उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले आणि शुभमच्या आठवणींना सगळ््यांनी उजाळा दिला. शुभम तू ये ना, मला सोडून जाऊ नकोस, असे सांगत आईने दु:खाला वाट करून दिली. तर वडील सतत शुभमच्या मृतदेहाकडे बघून शुभम आम्हाला सोडून जाऊ नकोस, असे म्हणत होते. मावशी तसेच शुभमच्या बहिणीनेही शुभमचा मृतदेह पाहताच किंकाळ्या ठोकल्या. अनेकजण शुभमच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. डॉ. शंकर सावंत हे सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.जग पाहण्यापूर्वी शुभमदेशासाठी शहीदनौदलाच्या बचावकार्यात इतरांचे प्राण वाचविण्यासाठी गेलेल्या शुभमला स्वत:चे प्राण गमवावे लागले. शुभम देशासाठी शहीद झाला. तो अवघ्या २२ वर्षांचा असतानाच. वीस महिन्यांपूर्वीच तो नौदलात रूजू झाला होता. पण त्याला पूर्ण जगही पाहता आले नाही.जिल्ह्यातील मान्यवरांकडून शुभमचे अंत्यदर्शननौदलाच्या बचावकार्यावेळी शहीद झालेल्या शुभम सावंतचा मृतदेह माजगाव येथील त्याच्या घरी आणल्यानंतर प्रशासनाच्यावतीने तहसीलदार सतीश कदम यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित देसाई, दाजी वारंग, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली, दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती प्रमोद सावंत, श्वेता कोरगावकर, सरपंच आबा सावंत, अशोक दळवी, प्रा.दिलीप भारमल, डि. जी. सावंत, रेश्मा सावंत, उपसरपंच आमिदी मेस्त्री, मनसेच्या चैताली भेंडे, भारती रावराणे, अ‍ॅड. सिध्देश भांबुरे आदींनी अंत्यदर्शन घेतले.अंत्ययात्रेत गर्दीचा उच्चांकमाजगाव गावाला सैनिकी परंपरा आहे. यापूर्वी गावातील दीपक सावंत हा जवान सीमेवर शहीद झाला होता. त्यानंतर नौदलात कार्यरत असणारा शुभम याचा मदतकार्यात असताना मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत अख्खा गाव सहभागी झाला होता. तब्बल चार ते पाच हजार ग्रामस्थ उपस्थित होते. शहिद शुभमवरील प्रेमामुळे गर्दीने उच्चांक गाठला होता.माजगाव ग्रामसुरक्षादलाचे मोठे योगदानशुभम सावंतचा मृतदेह माजगाव येथे आणल्यानंतर माजगाव ग्रामस्थांनी तयार केलेल्या ग्रामसुरक्षादलाने पहिल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत स्वत:कडे ताबा घेत गर्दीवर नियंत्रण राखले. तसेच सर्वांना शुभमचे दर्शन घडवून दिले. (प्रतिनिधी)