शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

...तर कन्हैयाला ‘रानडे’त बोलावूच

By admin | Published: March 25, 2016 3:54 AM

पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील कन्हैयाकुमारला विभागात बोलाविण्यावरून उठलेल्या वादंगामुळे विद्यार्थ्यांनी कन्हैयाकुमारला

पुणे : पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील कन्हैयाकुमारला विभागात बोलाविण्यावरून उठलेल्या वादंगामुळे विद्यार्थ्यांनी कन्हैयाकुमारला आता विभागात आणणारच, असा चंग बांधला आहे.पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग म्हणजेच रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सोमवारी जेएनयू येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आलोकसिंग चर्चेसाठी आला होता. त्याने रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर जेएनयू येथील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार यास बोलावून त्याची बाजू समजून घ्यावी, चर्चा करावी, असा मतप्रवाह विभागात असल्याचे रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी सांगितले. यासंबंधीची चर्चा सुरू असताना, पुण्यातील भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता ओंकार कदम हा रानडे इन्स्टिट्यूटच्या कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी आला होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्याने बुधवारी २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रानडे इन्स्टिट्यूटमध्ये येऊन एका विद्यार्थ्याला गाठून धमकावण्यास सुरुवात केली. याविषयी ‘रानडे’मध्ये शिकत असणारा हर्षल लोहोकरे याने सांगितले की, ‘कदम वर्गात आला आणि त्याने आमच्या एका मित्राला धरले आणि कन्हैयाकुमारला बोलावल्यास ठोकून काढू, अशी धमकी दिली. तुम्हाला जर कन्हैयाकुमार भेटायची हौसच असेल तर रेल्वेच्या दोन बोगी बुक करून देतो. जेएनयूमध्ये जा आणि भेटा. पण जर पुण्यात त्याला आणले तर एकेकाला ठोकून काढेन,’ असे कदमने विद्यार्थ्यांना धमकावले. कदम याच्या या धमकीमुळे विद्यार्थ्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ‘आमच्या विभागात कोणाला आणायचे वा न आणायचे याबाबत इतरांनी सल्ला देण्याचे कारण नाही. तसेच अशा प्रकारे धमकावण्याची गरज नाही,’ असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. कन्हैयाकुमारची बाजू समजून घेण्याचा हेतू असला, तरी त्याला आणण्याविषयीचा आग्रह नव्हता. मात्र, जर कोणी अशाप्रकारे अडवणूक करणार असेल तर काहीही करून कन्हैयाकुमारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये बोलावण्यात येईल, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘फर्ग्युसन’प्रकरणी २५० जणांवर गुन्हाफर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी झालेल्या गोंधळाप्रकरणी डेक्कन पोलिसांनी विविध राजकीय पक्षांसह संघटनांच्या २५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभाविपने मंगळवारी विनापरवाना आयोजिलेल्या ‘जेएनयू का सच’ या कार्यक्रमात गोंधळ झाला होता. गोंधळानंतर डाव्या तसेच आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांच्या समर्थनासाठी बुधवारी महाविद्यालयात आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की करण्यात आली. या वेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपसांत भिडले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करताना सौम्य लाठीमार केला.