पिंपरी : मराठा आरक्षणाला विरोध करणा:यांचे सरकार राज्यात आले तर आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर 18क् दिवसात होणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, असे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी सांगितले.
मराठा सेवा संघाच्या पुणो जिल्हा शाखेचे एक दिवसीय अधिवेशन संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार शनिवारी पार पडले. अधिवेशानाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन लॉन टेनिस राष्ट्रीय खेळाडू शिवानी इंगळे हिच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजयकुमार ठुबे, पुणो जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, पुणो जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव जाधव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व्यंकटराव सूर्यवंशी, अमृतराव सावंत, नंदकुमार ढाणो, ज्ञानेश्वर मोळक, बाळासाहेब मातेरे, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या दुस:या सत्रत मराठा सेवा संघाची आजवरची वाटचाल या विषयावर श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले.