शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

... आणि गोव्यातील मांडवी पुल कोसळल्याची आठवण झाली ताजी

By admin | Published: August 03, 2016 8:51 PM

1986 सालचा 5 जुलैचा तो दिवस. देशाच्या इंजिनिअरिंग विज्ञान क्षेत्रत या दिवसाचा आरंभच खळबळ उडवून देणारा ठरला. 1970 साली बांधलेला मांडवी पुल केवळ

- सदगुरू पाटील

पणजी, दि. ३ - 1986 सालचा 5 जुलैचा तो दिवस. देशाच्या इंजिनिअरिंग विज्ञान क्षेत्रत या दिवसाचा आरंभच खळबळ उडवून देणारा ठरला. 1970 साली बांधलेला मांडवी पुल केवळ सोळा वर्षात 5 जुलै रोजी सकाळी कोसळला आणि पणजीचा पर्वरीसह उत्तर गोव्याच्या अन्य भागांशी असलेला संबंध तुटला. केवळ पणजीच नव्हे तर पूर्ण गोवा त्या दिवशी अंतर्बाह्य हादरून गेला. गोवा- मुंबई मार्गावरील महाड येथील पुल कोसळण्याच्या घटनेमुळे सोमवारी पणजीवासियांच्या व एकूणच गोव्यातील अनेकांच्या मनात मांडवी पुल दुर्घटनेची घटना ताजी झाली.मांडवी पुल कोसळण्याच्या घटनेस आता 30 वर्षे झाली. अजुनही त्या दुर्घटनेच्या खाणाखुणा मांडवी नदीच्या अंगावर दिसून येतात. त्या दुर्घटनेनंतर मांडवीवर दुसरा नवा पुल बांधला गेलाच, शिवाय आता तिसरा पुलही बांधला जात आहे. 1970 साली मांडवीवर बांधलेला पुल सोळा वर्षातच कोसळेल, असे कुणालाच वाटले नव्हते. हैद्राबाद येथील पायोनियर कंपनीने या पुलाचे बांधकाम केले होते. पुलाचे प्री-स्ट्रेस्ड केबल गंजले होते. मांडवी नदीतून जे लोक प्रवास करत होते, त्यांना छत गळल्याप्रमाणो पुल गळतानाही त्यावेळी दिसत होते. मात्र तो पुल कोसळू शकतो, अशी कल्पना त्यावेळी बांधकाम खात्यालाही आली नव्हती. पुल कोसळल्यानंतर आत रिक्षा पडल्याची भीतीयुक्त चर्चा पसरली होती पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. त्या दुर्घटनेत मानवी हानी टळली. एक बसगाडी पुढे गेली व मागे पुल कोसळला, असा अनुभव त्या दुर्घटनेच्या काळी जी माणसे युवावस्थेत होती, ती अजुनही सांगतात. गोव्यात तत्पूर्वी एवढा मोठा पुल कोसळण्याची घटना कधीच घडली नव्हती व त्यानंतरही घडली नाही. खनिज खाण कोसळणो, डोंगराचा भाग कोसळणो, इमारत कोसळून त्यात 32 जणांचा बळी जाण्याच्या घटनाही गोव्यात घडल्या पण मांडवी नदीवरील वरवर भक्कम दिसणारा पुल कोसळण्याची घटना 86 साली घडली, त्याची आठवण महाडच्या दुर्घटनेने जागी केली व अनेक गोमंतकीयांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी चुकला.