ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंबईसारख्या महागड्या शहरात केवळ एका रुपयामध्ये प्रसूती झाल्याचं ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. काहींना विश्वासही नाही बसणार... पण हे खरं आहे. घाटकोपर स्टेशनवर एका महिलेची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली आहे. या महिलेने एका मुलीला जन्म दिलाय.
घाटकोपर स्थानकावर असलेल्या ‘वन रुपी क्लिनिक’मुळे हे शक्य झालं आहे. येथे आज सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रसूती वेदना व्हायला लागल्याने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी टिटवाळ्यात राहणा-या गुडिया महंमद शेख यांनी आपल्या पतीसह मुंबईकडे जाणारी लोकल पकडली. दादरच्या एका रूग्णालयात त्यांना जायचे होते. साधारण दुपारी दोनच्या सुमारास गाडी घाटकोपर स्थानकात आली आणि गुडिया यांना प्रसूती वेदना वाढल्या. अखेर घाटकोपरला उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गर्दीतून वाट काढत स्थानकावरच्या ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये हे जोडपं दाखल झालं. तेथे गेल्यावर अवघ्या एक रूपयामध्ये त्यांची प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. “बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असून बाळाचे वजन अडीच किलो आहे. सध्या त्यांना पुढील उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
रोजच्या धावपळीत मुंबईकरांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. यासाठीच रेल्वे स्थानकांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात आलं. वाशी, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, वडाळा अशा विविध स्थानकांवर गेल्या 2 महिन्यांपासून हे क्लिनिक सुरू आहेत. यात डॉक्टर स्वेच्छेने येऊन आपली सेवा देतात. या ठिकाणी उपचार घेणाऱ्या मुंबईकरांना फक्त ‘एक रुपया’ द्यावा लागतो.
महिलेच्या प्रसूतीच्या वेळी सिंहांचा गराडा-
राजकोट : गरोदर स्त्रीची प्रसूतीची वेळ जवळ आली की तिच्यासकट तिचे सारे नातेवाईकही भांबावून जातात. कित्येकदा रेल्वेत, स्टेशनवर, विमानात प्रसूती झाल्याच्या घटना आपण अनेकदा वाचल्या आहेत. पण सर्र्वाना आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना राजकोटमध्ये घडली. अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावात एका महिलेची प्रसूती झाली, तेव्हा तिच्या आसपास सिंहांनी गराडा घातला होता. त्या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी १0८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना...आणखी वाचण्यासाठी क्लिक करा...(महिलेच्या प्रसूतीच्या वेळी सिंहांचा गराडा)