ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - भाजपाला महापालिकेत सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे नेते गुरुदास काम यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन शिवसेनेबरोबर कोणतीही चर्चा करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाऊ नये किंवा त्यांना बाहेरुन पाठिंबा देऊ नये. काँग्रेसने अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपाच्या समाजात फूट पाडण्याच्या धोरणाविरोधात लढा दिला आहे. शिवसेनेसोबत गेल्यास जनता काँग्रेसला माफ करणार नाही असे गुरुदास कामत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
त्यांनाच त्यांचे मतभेद सोडवू दे. त्यातून ते उघडे पडतील आणि सत्तेसाठीची त्यांची लालसा लोकांना समजेल असे गुरुदास कामत यांनी पत्रकात म्हटले आहे. यासंबंधीचे मी माझे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना कळवले आहे असे त्यांनी सांगितले.
My thoughts on proposed alliance with Shiv Sena to form the Govt in BMC. @INCIndia@OfficeOfRG@mahcongresspic.twitter.com/Uz7QAwsUmE— Gurudas Kamat (@KamatGurudas) February 25, 2017