मुंबई - सध्या नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वाजीत कदम यांचे एका दुकाणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दुकाण दुसरी तिसर कशाचं नसून लहान मुलांच्या खेळणीचं होतं. अर्थात उभय युवा आमदार खेळण्याच्या दुकानात का गेले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याविषयी खुद्द रोहित पवार यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करून सांगितले.
फेसबुक पोस्टमध्ये रोहित म्हणाले की, मागील दहा बारा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेच निर्माण झाले. मात्र अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यातच काल अधिवेशन होते. याला आम्ही सगळे आमदार उपस्थित होतो.
दरम्यान अधिवेशन संपवून मी आणि आमदार विश्वजीत कदम गाडीने एकत्र निघालो होतो. यावेळी रस्त्यात खेळण्याचे दुकाण दिले. त्यावेळी दोघांनाही दुकाणात जाण्याचा मोह आवरला नाही. राजकारणात असताना संपूर्ण मतदार संघ तुमचं कुटुंब असतं. परंतु, कधी-कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. एक बाप म्हणून मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा देणं होत नाही. मात्र घरी गेल्यावर त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात पाहून मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असले तो माझ्यासाठी समाधानकारक असेल, असं रोहित यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.