शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

...आणि सैराटच्या कलाकारांचा लातुरातील कार्यक्रम रद्द

By admin | Published: October 14, 2016 11:21 PM

स्टार क्राप्ट मनोरंजन कंपनी मुंबईच्या वतीने ‘सैराट’ मधील सर्व कलाकारांसह ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांचा क्रीडा संकुलावरील कार्यक्रम क्रीडाप्रेमींच्या दबावामुळे अखेर

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 14 -  स्टार क्राप्ट मनोरंजन कंपनी मुंबईच्या वतीने ‘सैराट’ मधील सर्व कलाकारांसह  ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांचा क्रीडा संकुलावरील कार्यक्रम क्रीडाप्रेमींच्या दबावामुळे अखेर रद्द करण्यात आला. क्रीडा संकुलात मोठ मोठे खड्डे खोदून बॅरिगेटस् टाकले जात होते. यामुळे संकुलाचे मोठे नुकसान होत असल्याच्या आरोपावरून संतप्त झालेल्या क्रीडाप्रेमींनी शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाच्या पेण्डॉलचे साहित्य जाळले. क्रीडाप्रेमींच्या या दबावामुळे संयोजकांनी १६ आॅक्टोबर रोजीचा ‘सैराट’ कार्यक्रम रद्द केला आहे.
उजनी येथील श्री समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीसाठी आर्चीच्या उपस्थितीत ‘सैराट’ कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी संकुलातील मैदानावर पेण्डॉल उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते. यातून मैदानाचे मोठे नुकसान झाले. या मैदानावर दररोज सकाळी शेकडो खेळाडू सरावासाठी येतात. मात्र कार्यक्रमाची तयारी होत असल्याने त्यांना सरावासाठी जागाही मिळेना. ज्येष्ठ नागरिकांनाही फिरण्याची अडचण झाली. त्यातच मैदानाचे नुकसान होत होते. ही बाब सहन न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांसह सकाळी मैदानात आलेल्या खेळाडू व क्रीडाप्रेमींनी पेण्डॉल उभारणीचे काम बंद पाडले. शिवाय, पेण्डॉलच जाळला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड घटनास्थळी दाखल झाले. 
यावेळी उपस्थित गणेश गवारे, संतोष देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना मैदानाचे झालेले नुकसान दाखविले. त्यामुळे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले. जरी परवानगी असली, तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संयोजकांवर गुन्हे दाखल होतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्याने अखेर संयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे. गैरसोयीबद्दल स्टार क्राप्ट मनोरंजन कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, ज्यांनी प्रवेशिका घेतल्या आहेत, त्यांनी ७४७४८११३३३, ७४७४८११६६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 
 
१० हजार रुपये डिपॉझिट... 
क्रीडा संकुल समितीने संबंधित संस्थेकडून ‘सैराट’ कार्यक्रमासाठी १० हजार रुपये डिपॉझिट घेतले होते. शिवाय, १० हजार रुपये शुल्क या कार्यक्रमासाठी घेतले होते. कार्यक्रमानंतर मैदान दुरुस्त करून देण्याचे लेखी घेतले होते. त्यानुसार परवानगी देण्यात आली होती, असे जिल्हा क्रीडाधिकारी निर्मला अडसूळ यांनी सांगितले. 
 
मैदानाचे नुकसान झाल्याने नाराजी... 
४महिनाभरापूर्वी एका संस्थेने क्रीडा संकुलात दहीहंडीसाठी जागा मागितली होती. मात्र जिल्हा क्रीडा संकुल समितीने जागा देणे नाकारले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून समितीने हा निर्णय घेतला. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही जागा देणे नाकारले. हा पूर्वानुभव असताना समितीने या संस्थेला परवानगी कशी दिली, असा प्रश्न क्रीडाप्रेमींनी जिल्हाधिका-यांसमोर उपस्थित केला होता.