शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

आरं ऽऽ आरं ऽऽ आबा फिर कायकू बोल्या ?

By admin | Published: October 13, 2014 12:49 PM

दिवाळीसाठी सजविण्यात आलेला 'पॉलिटिकल फटाका स्टॉल'. खच्चून सुरुंग भरलेल्या फटाक्यांचे वेगवेगळे अँटम्स् रचून ठेवलेले. अशावेळी 'थोरले काका' आपल्या घरातील सर्व लेकरा-बाळांना घेऊन स्टॉलवर आलेले

होऊ दे चर्चा...

 (स्थळ : दिवाळीसाठी सजविण्यात आलेला 'पॉलिटिकल फटाका स्टॉल'. खच्चून सुरुंग भरलेल्या फटाक्यांचे वेगवेगळे अँटम्स् रचून ठेवलेले. अशावेळी 'थोरले काका' आपल्या घरातील सर्व लेकरा-बाळांना घेऊन स्टॉलवर आलेले.) थोरले काका : माझ्या लेकरांना चांगले फटाके दाखवा. येत्या दोन दिवसांत जोरात उडले पाहिजेत.दुकानदार : (सगळ्यांची देहबोली नीट निरखत संशयानं) रोख पैसे देऊन घेणार की..अजितदादा : (काकांचं बोट सोडून रागानं) आमच्या चेहर्‍यावर जाऊ नका. आम्ही म्हणजे सर्वात श्रीमंत अन् मालदार पार्टी. हे बघा माझ्या खिशात 'चार-चार रुपये!'जयंत : (खिशातली साखर खात) माझ्याकडं पण बारदाणं भरून खेळणी आहेत. माझी 'मिल्क टॉय' अन् 'कॉटन टॉय' तर खूप महाग.रामराजे : हो. हो. आमच्याकडं पण 'शुगर टॉय' आहे.छगन : (मफलरमधून तोंड बाहेर काढून कानात कुजबुजत) पण, ती कारखान्याची खेळणी तर केव्हाच बंद पडलीय ना?रामराजे :पण आपल्या दादांनी कोरेगावात ताईंची खेळणी बंद पाडून पुन्हा ताब्यात घेतलीय की. चांगलीच जिरवलीय ताईंची.दुकानदार :(आश्‍चर्यानं) काकाऽऽ तुमची पोरं भलतीच तयारीची. बघावं तेव्हा जिरवा-जिरवीचीच भाषा.(आपली पोरं प्रमाणापेक्षा जास्त बडबडताहेत हे लक्षात येताच 'काकां'नी गडबडीनं प्रत्येकाला 'लिमलेट'ची गोळी दिलेली.)काका : पोरांनो ऽऽ गोळी खा. तोंड बंद करा.अजितदादा : काका. मला किनऽऽई भुईचक्कर पाहिजे. मी कर्‍हाडात जाऊन उडवणार.आबा : मलाऽऽ पण सुरसुरीऽऽ पायजे. मी सगळ्यांना वाजवून दाखविणार.काका : (चिडून) तुमची नस्ती 'सुरसुरी' बघून मला 'भुईवर चक्कर' यायची वेळ आलीय. गप्प बसा ऽऽदुकानदार : (कळवळून) तुमचं 'आबा लेकरू' खूपच गरीब दिसतंय होऽऽ. तुम्ही रागावल्यावर बघा कसं केविलवाणं तोंड करून बसलंय.काका : (आबांचा साळसूद चेहरा पाहून चरफडत) पण, आमच्या या हुश्शार लेकराला कुठं काय बोलावं, हेच कळत नाही. आरंऽऽ आबा. कोणता फटाका पाहिजे?आबा : (समोर बोट दाखवत) मला ना ऽऽ ते 'रॉकेट' पाहिजे. मी ते हातातच धरून उडवणार. मज्जाऽऽ येईल बघा काका.दुकानदार : (दचकून) आबा ऽऽ ते रॉकेट लई डेंजर. चुकून उलटलं अन् घरात शिरलं तर ? कारण याचं नावच 'राजरॉकेट'. म्हणूनच 'बडे-बडे फटाकोंको छोटी-छोटी बत्ती कभी नहीं लगाना.'काका : (घाम पुसत) हे लेकरू त्याच्यासोबत आमचीपण 'दिवाळी' वाजवणार वाटतं. ही घे अजून एक लिमलेटची गोळी.अजितदादा : (सुतळी बॉम्बकडं बोट करत) मला पण काकाऽऽ तो मोठ्ठा-मोठ्ठा 'मोदी फटाका' पाहिजे. मी त्याला 'धरणा'त नेऊन उडविणार. त्याचा आवाज म्हणे खूप- खूप मोठ्ठा. (खिशातून माचीस काढत) लावू का इथंच त्याला बत्ती ?काका : (घाईघाईनं लिमलेट गोळ्यांचा अख्खा डबाच देत) लेकरांनो ऽऽ हे घ्या सगळ्या गोळ्या; पण ती 'बाबा' छाप माचीस आत ठेवा. तुम्ही आपलं 'देव-विनोद' टिकली उडवा. मी त्या 'सुतळी बॉम्ब'चं बघतो.दुकानदार : (काकांना कोपर्‍यापासून दोन्ही हात जोडत) काका ऽऽ तुमची मात्र धन्य-धन्य; कारण अशा 'डेंजर' लेकरांना घेऊन म्हणे तुम्ही यंदाची 'दिवाळी' साजरी करणार ! यू आर ग्रेट !!- सचिन जवळकोटेस्थळ : दिवाळीसाठी सजविण्यात आलेला 'पॉलिटिकल फटाका स्टॉल'. खच्चून सुरुंग भरलेल्या फटाक्यांचे वेगवेगळे अँटम्स् रचून ठेवलेले. अशावेळी 'थोरले काका' आपल्या घरातील सर्व लेकरा-बाळांना घेऊन स्टॉलवर आलेले.) थोरले काका : माझ्या लेकरांना चांगले फटाके दाखवा. येत्या दोन दिवसांत जोरात उडले पाहिजेत.दुकानदार : (सगळ्यांची देहबोली नीट निरखत संशयानं) रोख पैसे देऊन घेणार की..अजितदादा : (काकांचं बोट सोडून रागानं) आमच्या चेहर्‍यावर जाऊ नका. आम्ही म्हणजे सर्वात श्रीमंत अन् मालदार पार्टी. हे बघा माझ्या खिशात 'चार-चार रुपये!'जयंत : (खिशातली साखर खात) माझ्याकडं पण बारदाणं भरून खेळणी आहेत. माझी 'मिल्क टॉय' अन् 'कॉटन टॉय' तर खूप महाग.रामराजे : हो. हो. आमच्याकडं पण 'शुगर टॉय' आहे.छगन : (मफलरमधून तोंड बाहेर काढून कानात कुजबुजत) पण, ती कारखान्याची खेळणी तर केव्हाच बंद पडलीय ना?रामराजे :पण आपल्या दादांनी कोरेगावात ताईंची खेळणी बंद पाडून पुन्हा ताब्यात घेतलीय की. चांगलीच जिरवलीय ताईंची.दुकानदार :(आश्‍चर्यानं) काकाऽऽ तुमची पोरं भलतीच तयारीची. बघावं तेव्हा जिरवा-जिरवीचीच भाषा.(आपली पोरं प्रमाणापेक्षा जास्त बडबडताहेत हे लक्षात येताच 'काकां'नी गडबडीनं प्रत्येकाला 'लिमलेट'ची गोळी दिलेली.)काका : पोरांनो ऽऽ गोळी खा. तोंड बंद करा.अजितदादा : काका. मला किनऽऽई भुईचक्कर पाहिजे. मी कर्‍हाडात जाऊन उडवणार.आबा : मलाऽऽ पण सुरसुरीऽऽ पायजे. मी सगळ्यांना वाजवून दाखविणार.काका : (चिडून) तुमची नस्ती 'सुरसुरी' बघून मला 'भुईवर चक्कर' यायची वेळ आलीय. गप्प बसा ऽऽदुकानदार : (कळवळून) तुमचं 'आबा लेकरू' खूपच गरीब दिसतंय होऽऽ. तुम्ही रागावल्यावर बघा कसं केविलवाणं तोंड करून बसलंय.काका : (आबांचा साळसूद चेहरा पाहून चरफडत) पण, आमच्या या हुश्शार लेकराला कुठं काय बोलावं, हेच कळत नाही. आरंऽऽ आबा. कोणता फटाका पाहिजे?आबा : (समोर बोट दाखवत) मला ना ऽऽ ते 'रॉकेट' पाहिजे. मी ते हातातच धरून उडवणार. मज्जाऽऽ येईल बघा काका.दुकानदार : (दचकून) आबा ऽऽ ते रॉकेट लई डेंजर. चुकून उलटलं अन् घरात शिरलं तर ? कारण याचं नावच 'राजरॉकेट'. म्हणूनच 'बडे-बडे फटाकोंको छोटी-छोटी बत्ती कभी नहीं लगाना.'काका : (घाम पुसत) हे लेकरू त्याच्यासोबत आमचीपण 'दिवाळी' वाजवणार वाटतं. ही घे अजून एक लिमलेटची गोळी.अजितदादा : (सुतळी बॉम्बकडं बोट करत) मला पण काकाऽऽ तो मोठ्ठा-मोठ्ठा 'मोदी फटाका' पाहिजे. मी त्याला 'धरणा'त नेऊन उडविणार. त्याचा आवाज म्हणे खूप- खूप मोठ्ठा. (खिशातून माचीस काढत) लावू का इथंच त्याला बत्ती ?काका : (घाईघाईनं लिमलेट गोळ्यांचा अख्खा डबाच देत) लेकरांनो ऽऽ हे घ्या सगळ्या गोळ्या; पण ती 'बाबा' छाप माचीस आत ठेवा. तुम्ही आपलं 'देव-विनोद' टिकली उडवा. मी त्या 'सुतळी बॉम्ब'चं बघतो.दुकानदार : (काकांना कोपर्‍यापासून दोन्ही हात जोडत) काका ऽऽ तुमची मात्र धन्य-धन्य; कारण अशा 'डेंजर' लेकरांना घेऊन म्हणे तुम्ही यंदाची 'दिवाळी' साजरी करणार ! यू आर ग्रेट !!- सचिन जवळकोटे