जान्हवी मोर्ये, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)‘आईना टूट गया, और हम सवरते ही रहे...’ या ओळी साद इलाहाबादी यांनी सादर करताच उपस्थितांची जोरदार दाद मिळाली. त्यांच्यापाठोपाठ उत्तमोत्तम कवींनी त्यांच्या रचना सादर करून मराठीच्या मांडवात बहुभाषिक प्रतिभेचे दर्शन घडवले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी रात्री ‘आंतरभारती’ हे स्थानिकांचे बहुभाषिक संमेलन रंगले. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच बहुभाषिकांना स्थान देण्यात आले. या वेळी निरंजन पांड्या व रेखा रोशनी (गुजराती), अफसर देखने ( तेलुगू), साज इल्लहाबादी (उत्तर भारत), जितेंद्र पांडे (भोजपुरी), झिंगू बोलके (लोकगीत), वैजयंता साळवे (मराठी), योगिता वानखेडे (मराठी), हरिकिशन, लोकमान तिलक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पंडित यांनी केले.जितेंद्र पांडे यांनी, जेव्हा ते मुंबईत वास्तव्यास आले, त्या काळात फोन फार नव्हते. त्या वेळी गावी चिठ्ठी पाठवून खुशाली विचारली जात असे, यावर आधारित असलेली ‘यहाँ सब खुशाल हो’ ही कविता त्यांनी सादर केली. साद इल्लाहाबादी यांनी ‘आईना तूट गया, हम सवरते ही रहै’ ही कविता सादर केली. त्यानंतर, त्यांनी ‘क्या इरादा है, मैने तु दूर से वो जान गये, बात कुछ भी नही हुई और बुरे मान गये’, हा शेर प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. इलाहाबादी यांनी ‘हमने बाहे मोहब्बत मे आसू’ आणि ‘कोई हस हस के पिये यु भी छुपाये आसू, कोई रो रो के जमाने को दिखाये आसू’ या गझलही त्यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. रेखा रोशनी यांनी ‘दर्द छे अवकाश छे’ ही गुजराती कविता सादर केली. विजय पंडित यांनी सादर केलेल्या ‘मुझे से कभी जमीर को भूला न दिया’ ही शायरी सादर करून प्रेक्षकांची वन्स मोअरची दाद मिळवली. झिंगू बोलके यांनी भ्रूणहत्येवरील रचना ‘मुली भार नाही दादा, मुली आहेत आधार’ सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले. निरंजन पांड्या यांनी रेल्वेतील अनुभवाविषयी गुजरातीतून कथाकथन केले. योगिता वानखेडे यांनी ‘भीमरायाने मंत्र आम्हाला शिक्षणाचा दिला’ ही कविता सादर केली. वैजयंता साळवे यांनी ‘श्रीमंतांची मुले खातात मोठ्या पावांचे पिझ्झा बर्गर’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हरिकिशन यांनी तेलुगू अनुवाद सादर केला. त्याचे भाषांतर त्यांची मुलगी आरती कन्नान यांनी प्रेक्षकांसमोर उलगडले.
‘...और हम सवरते ही रहे...’
By admin | Published: February 06, 2017 1:01 AM