शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

आंध्र, गुजरातला कऱ्हाडच्या गुळाची गोडी!

By admin | Published: October 26, 2015 10:44 PM

बाजार समितीत गुळाची आवक : सौद्यात परराज्यातील व्यापाऱ्यांची बोली; मागणी वाढल्याने उच्चांकी दराची अपेक्षा

कऱ्हाड : तालुक्यात खासगी तसेच सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांत दरवर्षी कोट्यवधी टन उसाचे गाळप होते. ‘साखरेचा पट्टा’ म्हणून कऱ्हाड तालुक्याची ओळख आहे. मात्र, साखरेसोबत आता कऱ्हाडच्या गुळाची गोडीही वाढली आहे. येथील बाजार समितीमार्फत कऱ्हाडचा गूळ परराज्यात पोहोचत असून, मागणी जास्त असल्याने गुळाला विक्रमी भावही मिळत आहे. उसाला चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी सध्या आंदोलनाची दिशा ठरवित कंबर कसली आहे. शेतकरीही चांगल्या दराच्या प्रतीक्षेत असून, गळीत हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कऱ्हाडच्या बाजार समितीतही गुळाची आवक सुरू झाली आहे. सौद्यांना प्रारंभ झाला आहे. गत काही वर्षांत उसाची कमतरता, ऊसदराच्या मागणीसाठी संघटनांचे आंदोलन व ऊसतोड कामगार थांबतील का जातील, अशा कात्रीत कारखानदारांबरोबरच शेतकरी ही अडकला आहे. मात्र, या परिस्थितीत गुळाला उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकरी गुऱ्हाळाकडे वळले असल्याचे चित्र आहे. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी गुऱ्हाळघराकडे ऊस पाठवित आहे. हंगामाला उशीर झाल्यास उसाचे वजन घटेल. तसेच गुळाचे पैसे एका महिन्यात एकरकमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांचा रस्ता धरला आहे. वास्तविक, कऱ्हाड तालुक्यात कृष्णा, सह्याद्री, जयवंत शुगर, रयत आदी कारखाने आहेत. या कारखान्यांवर दरवर्षीच्या हंगामात कोट्यवधी टन उसाचे गाळप होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्मितीही केली जाते.मात्र, साखरेबरोबरच कऱ्हाड तालुक्यात गुळाचे उत्पादनही मोठे आहे. ज्यापटीत ऊस कारखान्याला गळितासाठी घातला जातो त्याचपटीत हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस गुऱ्हाळगृहांवर गळीत केला जातो. त्यातून गूळनिर्मितीही मोठ्या प्रमाणावर होते. गुऱ्हाळ गृहांमध्ये तयार करण्यात आलेला गूळ कऱ्हाडच्या मार्केटमध्ये घालण्यात येतो. गुळाच्या मार्केटसाठी कऱ्हाड पूर्वीपासूनच परिचित आहे. येथील मार्केटमध्ये गुळाला चांगला भाव मिळतो. तसेच सौदेही लवकर होत असल्याने कऱ्हाडसह आसपासच्या तालुक्यातील शेतकरीही आपला गूळ विक्रीसाठी येथील मार्केटमध्ये आणतात. यावर्षीच्या गूळ सौद्यांना नुकताच प्रारंभ झाला आहे. येथील बाजार समितीमधून गूळ मुंबई व गुजरातच्या मार्केटला पुरविण्यात येतो. आठवड्यातून दोन दिवस गुळाचे सौदे होतात. या दोन दिवसांत आंध्रप्रदेश, गुजरात तसेच अन्य काही राज्यांतील व्यापारी कऱ्हाडचा गूळ खरेदी करतात. संबंधित राज्यांमध्ये येथील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा करताना गुळाला दरही चांगला मिळत आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी ४७ कोटी ४४ लाखांची उलाढालकऱ्हाड बाजार समितीत गतवर्षी गूळ सौद्याच्या माध्यमातून ४७ कोटी ४४ लाख एवढी प्रचंड उलाढाल झाली होती. आर्थिक वर्षातील उलाढालीचा हा आकडा प्रत्येक वर्षी वाढत असून, यावर्षीही यापेक्षा मोठी उलाढाल बाजार समितीला अपेक्षित आहे.विक्रमी ६ हजार ३०० दरबाजार समितीत गूळ सौद्याला दरवर्षी विक्रमी दर मिळतो. गतवर्षी येथे ६ हजार ३०० एवढा दर मिळाला होता. तर सरासरी दराचे प्रमाण २ हजार ८०० रुपये होते. यावर्षी ३ हजार २०० पासून सुरुवात गुळाच्या सौद्याला परराज्यातील व्यापारीही उपस्थित असतात. येथील शेतकऱ्याच्या गुळाला उच्चांकी दर मिळावा, यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत असते. मात्र, चांगल्या दरासाठी शेतकऱ्यांनीही दर्जेदार गूळ उत्पादनाबाबत काळजी घ्यावी. - बी. बी. निंबाळकर,प्रभारी सचिव, बाजार समिती