तंत्रज्ञान जसे वेगाने सुधारत जातेय तसेच त्यातील धोकेही वाढत आहेत. दिवसेंदिवस जगभरात अँड्रॉइड, विंडोजचे युझर्स वाढत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला आयटी सुरक्षेच्या बाबतीत सजग राहण्याचीही गरज आहे. गेल्या वर्षात अँड्रॉइड आणि विंडोज प्लॅटफॉर्मवर ‘रॅन्समवेअर’चा वाढता प्रभाव पाहता ‘क्विक हील’ने २०१४मधील थ्रेट्सचा (धोक्यांचा) अभ्यास करून ‘२०१५ : थ्रेट रिपोर्ट’ प्रकाशित केला आहे. त्यात ‘रॅन्समवेअर’ हा २०१५ सालातील सर्वांत मोठा धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.‘रॅन्समवेअर’ म्हणजे काय? : ‘रॅन्समवेअर’ हा एक प्रकारचा मालवेअर म्हणजेच घातक प्रोग्राम आहे. जो कॉम्प्युटर वापरात अडथळे आणतो. याशिवाय पेड अॅप्सचे निर्बंध काढून टाकण्याची विनंती करून, प्रत्यक्ष व्यवहार करण्याची धमकीही देतो. विंडोजवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘रॅन्समवेअर’ आता अँड्रॉइडसाठीही सज्ज झालाय. गेल्या वर्षी प्रामुख्याने अँड्रॉइड कोलर, अँड्रॉइड सिम्पलॉकर, अँड्रॉइड सेल्फमाईट, अँड्रॉइड ओल्डबूट, अँड्रॉइड टोरेक अशा ‘रॅन्समवेअर्स’ची लागण झालेली दिसून आली. त्यांचा प्रभाव या वर्षी अधिक जाणवेल, असे मत तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.२०१५मधील धोके : आॅनलाइन जाहिरातीने किंवा आॅनलाइन अटॅकद्वारे डेटा एन्क्रिप्ट करून आर्थिक माहितीची चोरी होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे फेक इमेल अकाउंट्स, बँकेचे इन्फेक्टेड नवे मोबाइल अॅप्स आणि त्यातला महत्त्वाचा पण इन्फेक्टेड डेटा, नवीन पेमेंट सिस्टम्स, फसवे कॉल्स, टेक्स्ट मेसेजेस, फिशिंग पेजेस, कंपन्यांची फेक पेजेस, अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील फेक अॅप्स आणि अॅडवेअर्स यांपासून सावध राहा.२०१४ वर्षात आयटी आणि सुरक्षा क्षेत्रातील अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. हल्लेखोर माहिती चोरण्यासाठी सतत नवनव्या आणि तितक्याच भेदक पद्धती शोधत आहेत. धोक्यांचे स्वरूप बदललेले असल्याने अँटिव्हायरस कंपन्यांना अधिक सक्रिय आणि दक्ष राहावे लागणार आहे.२०१४मधील मालवेअर्सची टॉप टेन ब्लॅकलिस्टअँड्रॉइड वाईसर, अँड्रॉइड मोबीक्लिक, अँड्रॉइड गेड्मा, अँड्रॉइड कुगोस, अँड्रॉइड एजन्ट, अँड्रॉइड एसएमएसरेग, अँड्रॉइड डूमोब, अँड्रॉइड इन्व्हिस, अँड्रॉइड सीवेथ, अँड्रॉइड सेक एपीके.खबरदारीचे उपायफ्री तसेच अनट्रस्टेड वायफाय वापरणे टाळाइमेल अकाउंट्सचे विक आणि साधे सोपे पासवर्ड बदलाअॅप्लिकेशन्सचे ट्रस्टेड वर्जन्स अपग्रेड करापीसी किंवा मोबाइल रिमोट अॅक्सेसिंग शक्यतो टाळाअनोळखी चॅटिंग अॅप्सच्या जाळ्यात अडकू नकासोशल नेटवर्किंवरील अनावश्यक अॅप्सवर क्लिक करणे टाळाफेक अॅप्लिकेशन्स वापरणे तत्काळ बंद करातुषार भामरे
अँड्रॉइड, विंडोजसाठी २०१५ धोक्याचं
By admin | Published: January 11, 2015 2:01 AM