'अखिल भारतीय मागणी दिवस'मुंबई : गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १०जुलै हा ह्यअखिलभारतीय मागणी दिवसह्ण म्हणून पाळत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात ११ व १२ जुलै रोजी मोर्चे काढले जातील.सीटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशनच्या शुभा शमीमयांनी सांगितले की, ह्य१० जुलैला रविवार असल्याने, पुण्यात ११ जुलैला, तर मुंबईत ११ जुलैला मोर्चा काढला जाईल. एकूण २६ राज्यांमध्ये या वर्षी मोर्चे काढले जातील. देश पातळीवरील मागण्यांसोबतच स्थानिक पातळीवरील मागण्यांचा पाठपुरावा मोर्चाच्या निमित्ताने केला जाईल. दर तीन वर्षांनी केंद्र शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते.त्यानुसार, २००८ आणि २०११ साली शासनाने वाढ केली. मात्र, त्यानंतर २०१४ साली अपेक्षित मानधनवाढ झालीच नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केली आहे. शिवाय राज्य पातळीवर दोन वेळा संप करत मोर्चे काढल्यानंतर, सरकारने मानधनवाढ व एकरकमी सेवासमाप्ती लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात सेवासमाप्ती लाभाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याची माहिती सीटूच्या आरमायटी इराणी यांनी दिली.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्याकेंद्र शासनाने आयसीडीएस केवळ तात्पुरती योजना म्हणून न राबवता, त्याचेनियमितीकरण करावे व त्याला महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत उपखात्याचादर्जा देऊन शासनाचा कायमचा उपक्रम म्हणून राबवावा.सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी.सेविकांना १० हजार व मदतनिसांना ७ हजार ५०० मानधन लागू करा.सेविका, मदतनिसांना भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्यविमा, घरकुलासाठीअनुदान इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.सेविका, मदतनिसांना वर्षातून १५ दिवसांची पगारी वैद्यकीय रजा वउन्हाळ्याची १ महिन्याची सुट्टी मंजूर करावी.दिवाळीला सेविका, मदतनिसांना सेविकांच्या एका मानधनाइतका समान बोनस देण्यात यावा.मानधन दर महिन्याच्या १० तारखेच्या आत नियमितपणे अदा करण्यात यावे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन
By admin | Published: July 08, 2016 8:03 PM