शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अंगणवाडी कर्मचारी संप चिघळला, वित्तमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 5:31 AM

राज्यातील संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनी हजारोंच्या संख्येने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेत ठोस निर्णय न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा कृती समितीने जाहीर केला असून, बुधवारी मंत्रालयात यासंदर्भातील बैठक पार पडणार आहे.

मुंबई : राज्यातील संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनी हजारोंच्या संख्येने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेत ठोस निर्णय न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा कृती समितीने जाहीर केला असून, बुधवारी मंत्रालयात यासंदर्भातील बैठक पार पडणार आहे.कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम म्हणाल्या की, शिष्टमंडळाच्या भेटीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव उपस्थित होत्या. मानधनवाढ समितीने केलेल्या शिफारशींचा आधार घेऊन मानधनवाढीसाठी आवश्यक निधीची तरतूद करणारा प्रस्ताव तयार करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शिष्टमंडळास बुधवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठकीसाठी बोलावले आहे. त्यानंतर तत्काळ प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाला पाठवला जाईल. मग येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र निर्णय होत नाही, तोपर्यंत २ लाखांहून अधिक कर्मचारी संप सुरूच ठेवतील.मानधनवाढीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा पवित्रा कृती समितीने घेतल्याचे कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले.कुपोषित मुलांना वेठीस धरू नकाअंगणवाडी कर्मचा-यांनी मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी कुपोषित बालके, गरोदर व स्नतदा माता यांना वेठीस धरू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनीता वेद सिंगल यांनी केले आहे. मानधनवाढीच्या मागणीवर वित्त व नियोजन विभागाकडून उचित कार्यवाही सुरू आहे. त्यास वेळ लागत असला, तरी कर्मचाºयांनी महिला व बालकांच्या पोषणविषयक व आरोग्याच्या अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम बंद ठेवणे योग्य नसल्याचे मत सिंगल यांनी मांडले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार