शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 5:21 AM

या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर/लातूर/बेळगाव : बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमावर्ती जिल्ह्यात उमटले. संतप्त जमावाने कर्नाटकी वाहने व व्यावसायिकांची दुकाने लक्ष्य केली. दरम्यान, या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील वाहनांवर दगडफेक करीत दोन वाहनांची तोडफोड केली. मिरज पंचायत समिती आवारातील छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली आहे.कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध केला. सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा दिला.

लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लुंगी फाडून, तर उस्मानाबादमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीने कर्नाटकचा झेंडा जाळून शनिवारी निषेध नोंदविला. कन्नड रक्षक वेदिकेच्या पुतळ्याचेही दहन केले. सोलापुरात शिवप्रेमींनी शिवाजी चौकात एकत्र येत निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही किरकोळ गोष्ट असून, अशा क्षुल्लक गोष्टीसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरुनही शिवप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवछत्रपतींच्या मूर्ती विटंबनेच्या प्रकाराची केंद्र आणि कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली आहे.

- सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा संतप्त नागिरकांनी दिला आहे.

शिवरायांचा कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालावे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासीयांच्या अस्मितेवर हल्ला आहे. कर्नाटक आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजmiraj-acमिरजbelgaonबेळगाव