आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांना निवडणुकीसंबंधित कामे देऊ नयेत याबाबतचे पत्रच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहे. सरकार धोरणाच्या विरोधात जाऊन अंगणवाडी सेविकांची ड्युटी लावल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी ‘दिला.
ठिकठिकाणच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतदानाच्या दिवशी या सेविकांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी संबंधित अंगणवाडी सेविकांनी मतदानाला बालकांसहित येणाºया महिला मतदारांना योग्य त्या सुविधा देण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही दिला आहे. सरकारनेच काढलेल्या आदेशाच्या विरोधात जाऊन अंगणवाडी कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामाला जुंपले जाणार आहे. या विरोधात राज्याच्या विविध भागातून अंगणवाडी कर्मचाºयांचे सातत्याने फोन येत आहेत. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये संतापाची भावना असल्याचे बृजपाल सिंह म्हणाले.अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर कोणतेच आदेश काढलेले नाहीत. तालुकास्तरावर आदेश दिले आहेत का याची माहिती नाही; परंतु निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाºयांना आदेश काढताना प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशाबाबत काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. -पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड