सांगली : पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेला अमानूष मारहाण होत असतानाचे सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज गायब केले असावे, असे दस्तुरखुद्द गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.केसरकर यांनी मंगळवारी सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कोथळे कुटुंबियांची भेट घेतली.पोलिसांनी अनिकेतला बेदम मारहाण करुन त्याचा खून का केला? याचे कारण सीआयडीने स्पष्ट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा मृत अनिकेतचा भाऊ आशिष याने दिला.सांगली शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांना अटक केल्यास या घटनेतील सर्व पत्ते खुले होतील, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली.सांगली शहर पोलीस ठाण्यात सोडला वळूअनिकेत कोथळेचा खून करणाºया पोलिसांना पाठीशी घालणाºया वरिष्ठ पोलिस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्टÑविकास सेनेने अनोखे आंदोलन केले. या मागणीसाठी त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात ‘वळू’ सोडला. त्यांच्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. राष्टÑविकास सेनेचे अध्यक्ष अमोस मोरे व सुधाकर गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत ‘वळू’ आणला व शहर पोलिस ठाण्याच्या आवारात सोडला. आंदोलकांनी वळूच्या पाठीवर ‘आयजी वळू हटाव’ असे लिहिले होते.
अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण: पोलीस ठाण्यातील फुटेज गायब ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 3:01 AM