Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयाने (High Court) मोठा दिलासा दिला आहे. हाय कोर्टाने सीबीआयची (CBI) याचिका कोर्टाने फेटाळली असून, देशमुख यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येतील.
अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. पण, सीबीआयने हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतल दहा दिवसांच्या स्थगितीची विनंती केली. कोर्टाने ती विनंती मान्य केली आणि देशमुखांच्या कोठडीत वाढ झाली. ती मुदत संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली.
यानंतर अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका सीबाआयकडून दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीनाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे.
या प्रकरणात तुरुंगवासमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानंतर गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते या प्रकरणात अटकेत आहेत.