Rajya Sabha Election : अनिल देशमुखांची मतदानासाठी खटपट, मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 06:00 PM2022-06-09T18:00:27+5:302022-06-09T18:10:39+5:30
Anil Deshmukh has moved Bombay High Court : उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई : विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दणका दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला. परंतु कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. या विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक- उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे.
Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh has moved Bombay HC against rejection by the special PMLA court of his plea to cast his vote tomorrow for the Rajya Sabha elections. pic.twitter.com/m0PZnnIEhO
— ANI (@ANI) June 9, 2022
मतदानाला मुकावे लागणार, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना कोर्टाने दिला दणका
येत्या १० जूनला मतदान होणार असून तत्पूर्वी कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेत आहे. या निवडणुकीसाठी १ मतही महत्त्वाचे असल्याने महाविकास आघाडीची २ मते बाद झाल्याने मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविआ नेत्यांना आणखी कसरत करावी लागणार आहे. परंतु न्यायालयानं हा अर्ज नाकारल्यानं मतदानात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार नाही. दरम्यान, यावर जलसंपदा मंत्री जयंत राटील यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळे निराशा झाल्याचं म्हटलं.