मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. यानंतर गृह मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे प्रत्येकाच्याच निशाणावर दिसत आहेत. एवढेच नाही, तर याच मुद्द्यावर देशाच्या संसदेतही जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांची सारवासारव करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन, फेब्रुवारी महिन्यात बराच काळ अनिल देशमुख रुग्णालयात आणि नंतर आपल्या घरी क्वारंटाइन होते, असा दावा केला होता. मात्र, त्यांच्या या दाव्यानंतर आता देशमुखांसंदर्भात नव-नव्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. (Anil Deshmukh on Nagpur Mumbai charted flight document of 15 february)
पवारांच्या दाव्यानंतर आता अनिल देशमुखांसदर्भात, काही डॉक्युमेंट्स समोर आले आहेत. यावरून, या काळात अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार गोंधळले, चिडले अन् म्हणाले “इनफ इज इनफ”!
राज्यात अनिल देशमुख यांच्यावरून सुरू असलेल्या चर्चेतच चार्टर्ड विमानाचे डॉक्यूमेंट समोर आले आहे. हे डॉक्युमेंट 15 फेब्रुवारी, 2021चे आहे. यात प्रवाशांच्या यादीत अनिल देशमुखांचेही नाव आहे. यावरून स्पष्ट होते, की 15 फेब्रुवारीला अनिल देशमुखांनी या विमानातून नागपूर-मुंबई प्रवास केला होता.
अनिल देशमुखांनी व्हिडिओ जारी करत दिलं स्पष्टिकरण -यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, की " गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. काही ठिकाणी माध्यमांतूनही चुकीच्या बातम्या येत आहेत. यामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. नागपूरमध्ये असतानाच 5 फेब्रुवारीला मला कोरोनाची लागण झाली. यानंतर मी तेथील रुग्णालयात भरती होतो. 15 फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर होम क्वारंटाइनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो. यासंपूर्ण काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमाने बैठकांमध्ये भाग घेत होतो." या शिवाय, गृह मंत्री म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण संपूर्ण राज्याचा दौरा करत होतो, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण
काय म्हणाले होते शरद पवार -परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यांना १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाली; त्यानंतर १५ दिवस ते घरीच विलगीकरणात होते. देशमुख रुग्णालयात भरती असल्याचा रेकॉर्ड आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरीच आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यता नाही.
१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख क्वारंटाईन होते, मग हे कोण?; व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा पवारांना सवाल
आता, अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारी रोजी नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे एका कागदपत्रातून समोर येत आहे. देशमुख यांच्यासह 8 जणांनी हा प्रवास केला असून त्यात पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. एका खासगी विमानाने ते नागपूरहून मुंबईला आले. त्यामुळे या विमानप्रवासाच्या कागदपत्रामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत.