शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अनिल देशमुख म्हणतात बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे, अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंह हेच मास्टरमाइंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 7:24 AM

Anil Deshmukh News: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. परमबीर यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. परमबीर यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांना विधानभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले त्यावेळी परमबीर यांनी योग्य माहिती दिली नसल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी आणि मी गृहमंत्री असताना लगेचच परमबीर यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेऊन त्यांना डीजी होमगार्डकडे पाठवले. परमबीर यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. तसेच, परमबीर हेच वाझेंना वसुलीचे काम देत असल्याचा दावाही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला आहे.

त्याच वेळी राज्यातील पोलीस बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब आपल्याकडे देत असल्याचाही गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी ईडीकडे केला आहे. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे, पुढे तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्या या जबाबाचा समावेश आहे. देशमुख यांच्या या नव्या आरोपांमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात, अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली होती. त्यानेळी मी सांगितले होते की,  जर बदल्या नियमात बसत असेल तर ही प्रक्रिया करा अन्यथा प्रक्रिया करू नका असे सांगितल्याचे जबाबात नमूद आहे.

परबही द्यायचे बदल्यांची यादीपरमबीर यांनी दिलेल्या जबाबात, वारंवार सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलावून अनिल देशमुख आणि  मंत्री अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी दाखवली जायची. मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता. जुलै २०२० मध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली होती. ती सीताराम कुंटे यांनी व्हॉट्सॲप संदेश पाठवून मागे घ्यायला लावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो आदेश मागे घ्यायला लावला होता, असा दावाही परमबीर सिंह यांनी केला आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Parabअनिल परब