मुंबई : धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे विधामंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची आज गोटे यांनी भेट घेतली असून ते राजीनामा देणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
धुळे महापालिकेची निवडणूक येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोटे यांचा मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. यामुळे गोटे यांनी आक्षेप घेतलेला व राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आज गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आपले आक्षेप मांडले. यावर मुख्यमंत्र्यांनी अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून, धुळे महापालिकेची निवडणूक गोटे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार आहे.
तसेच सुभाष भामरे यांच्यासह इतर नेते त्यांना निवडणुकीवेळी मदत करतील. गोटे यांचे आक्षेप आपण ऐकून घेतले असून त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रभारी यांच्याशी चर्चा करतील.