शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

पिंपरीत उभारणार प्राणी संगोपन केंद्र

By admin | Published: July 15, 2017 1:40 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मोकाट प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संगोपन केंद्र उभारण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मोकाट प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संगोपन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने ३५ लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच पालिकेतर्फे गाय वगळता अन्य पाळीव प्राण्यांचे संगोपण केंद्र शहरात उभारणार आहे. शहरात शासनाचे एकही प्राणी संगोपन केंद्र नाही. त्यामुळे परिसरातील मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेतर्फे अशा प्रकारचे केंद्र असावे, अशी मागणी विविध प्राणी प्रेमी संस्थांची होती. मात्र, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उपलब्धता करून कोणी द्यायची, असा प्रश्न होता. त्यामुळे प्राणी संगोपन केंद्र केवळ चर्चेचाच विषय बनला होता. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे उपस्थित होते. या बैठकीविषयीची माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज दिली़ ते म्हणाले, ‘पालकमंत्र्याच्या बैठकीत प्राणी संगोपण करण्याची शासनाची योजना आहे. त्या अंतर्गत २६ एप्रिल रोजी पालिकेला पस्तीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. या बैठकीत विविध विकासकामाचा आढावा घेण्यात आला.’’महापालिकेकडून जागेचा शोध महापालिका परिसरात संगोपन केंद्रासाठी सव्वा एकर जागेची आवश्यकता आहे. एमआयडीसीची मोकळी जागा, गायरान किंवा पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मालकीच्या जागेत हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी नियोजन समितीकडून पस्तीस लाखांचा निधी मिळाला असून पायाभूत सुविधांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१७ च्या अगोदर केंद्राचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संगोपन केंद्रात कुत्रा, मांजर, घोडा तसेच अपघातात जखमी झालेले पक्षी सांभाळण्यात येणार आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सांगितले.