- सचिन कांबळेपंढरपूर, दि. 31 - चंद्रभागा नदीच्या पात्रात रोज अनेक ठिकाणी वरुन मैला मिश्रीत पाणी मिसळते. यामुळे संबध महाराष्ट्राची श्रध्दास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे रोज पावित्र नष्ट होत असल्याचा प्रत्यय भाविकांना येत आहे.विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वर्षाभरामध्ये कोट्यावधी भाविक पंढरपुरमध्ये येतात. पंढरीत आलेला प्रत्येक भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यापुर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात. त्याच बरोबर मोठ्या श्रध्देने चंद्रभागेतील पाणी तिर्थ म्हणून आपल्या गावी घेऊन जातात.मात्र शहरतील विविध ठिकाणचे घाण पाणी चंद्रभागा नदीच्या पात्रात मिसळते. यामध्ये अनिल नगर, व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, नगर वाचानलय आदि परिसरातून चंद्रभागेच्या नदी पात्रात पाणी मिसळते. यातील अनेक ठिकाणावरुन येणारे पाणी हे मैला मिश्रीत असते. तर मटन मार्केट परिसरातील कापलेल्या जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी देखील चंद्रभागेच्या नदी पात्रात मिसळते. या घाण पाण्यामुळे चंद्रभागेत स्नान करणार्यामुळे भाविकांच्या त्वचेचे विकार होतात.यामुळे मोठ्या श्रध्देने चंद्रभागेत पवित्र स्नान करणार्या भाविकांच्या भावनेशी प्रशासन खेळत असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रभागेत मिसळते घाणी पाणीअनिल नगर, व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, नगर वाचानलय, त्याचबरोबर चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असणार्या घाट परिसरातील भुयारी गटार तुंबली तर गटारीतील सर्व मैला चंद्रभागा नदीत मिसळतो.चंद्रभागेला पवित्र समजून स्नान करण्यासाठी व तिर्थ नेहण्यासाठी येणर्या महाराष्ट्रातील लाखो भाविकांना अशा मैला मिश्रीत चंद्रभागेत पवित्र स्नान करावे लागते. या नगरपालिकेच्या अधिकार्यांनी उपाय करावा अन्यथा आंदोलन करणार आहे.- नामदेव भुईटेनगरसेवक, पंढरपूरनदीच्या घाटाच्या बाजुने नव्याने भुयीरी गटार योजना करण्यात येणार आहे. तिसरा टप्पामध्ये भुयारी गटार योजनेचे काम पुर्ण होणार आहे. त्यावेळी नदी पात्रात मैला मिश्रीत होणारे पाणी कायमस्वरुपी बंद होईल.- ए. पी. जाधवपाणी पुरवठा, कनिष्ठ अभियंता, पंढरपूर नगरपालिका, पंढरपूर