पारनेर (जि़ अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना गुरूवारी एका पत्रातून धमकी आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी अण्णांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. यात राळेगणसिद्धितील तीन-चार ठिकाणांची त्यांनी पाहणी करुन पोलिसांना सूचनाही दिल्या.अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याला विरोध केल्याचा राग धरून राहाता येथील भाजपा कार्यकर्ता संजय घोलप या नावाचा उल्लेख करून अण्णांनी भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करू नये अन्यथा संपवून टाकू, असे पत्र पाठवून गुरूवारी धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आला.
अण्णा हजारेंच्या सुरक्षेचा आढावा
By admin | Published: June 27, 2015 1:19 AM