शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पंतप्रधान झाले तर अण्णा देश दारूमुक्त करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 5:53 AM

राजकारणाला नकार देणा-या अण्णा हजारे यांनी भावी पत्रकारांच्या बालचमूने घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले.

अहमदनगर - राजकारणाला नकार देणा-या अण्णा हजारे यांनी भावी पत्रकारांच्या बालचमूने घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. ‘मी पंतप्रधान होणार नाही. फकिराला कोण पंतप्रधान करणार? पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारुमुक्त करेल’,असे उत्तर अण्णांनी दिले! पत्रकारांच्या भूमिकेत शिरलेल्या बालचमूने अण्णांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची शालेय जीवनापासून उलटतपासणी घेतली. मुलांचे दप्तराचे ओझे हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा शब्दही अण्णांकडून वदवून घेतला.या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी थेट राळेगणसिद्धी गाठत अण्णांची मुलाखत घेतली. लहान मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची अण्णांची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे एरवी माध्यमांचा सराव असलेले अण्णाही जरा सावध होऊनच या पत्रपरिषदेला सामोरे गेले.अण्णा तुम्ही शाळेत खोड्या करत होतात का? तुम्ही नेमके कोणाला घाबरता? उपोषण करताना तुम्हाला भूक कशी लागत नाही? या वयातही तुम्ही एवढे काम करता, तुमच्या या सदृढ शरीराचे रहस्य काय? मोठ्यांसाठी तुम्ही खूप कामे केली, आम्हा लहानग्यांसाठी काय करणार? अशा एकाहून एक प्रश्नांचा भडिमार अण्णांवर झाला. उत्तरे देताना अण्णाही नकळत लहान होऊन गेले. शेवटी बालटीमला भ्रष्टाचारमुक्तीची व व्यसनमुक्तीची शपथ दिली.‘तुम्ही पंतप्रधान होणार की नाही? झालेच तर काय करणार? या प्रश्नावर अण्णा खळखळून हसले. ‘मी पंतप्रधान झालेलो या पुढाºयांना परवडणार नाही’, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. आपल्या उपोषणाचे रहस्यही अण्णांनी उलगडले, उपोषणाला सराव लागतो. तुमच्यासारखा वडापाव आणि पिझ्झा बर्गर खाल्ला तर उपोषण जमणार नाही, असे मिश्कील उत्तर अण्णांनी दिताच बालचमुंनी त्यास दाद दिली.मी फक्त आईला घाबरतोमला आयुष्यात कोणाचीही भीती वाटली नाही. अगदी सीमेवर गोळीची सुद्धा. पण, आईला जाम घाबरायचो. तिची सात्विक भीती होती. चुकलं तर आई काय म्हणेल याची चिंता असायची -अण्णा हजारेफुटाण्यावर लॉटरीमी शाळेत एक लॉटरी चालवायचो. पेन्सिलीने नंबर टाकायचो आणि ज्याचा जास्त नंबर त्याला तेवढे फुटाणे द्यायचो’, असे आपले लॉटरी खेळण्याचे रहस्य अण्णांनी उलगडले.नापासाचे धोरण चुकीचेराळेगणमधील नापासांच्या शाळेची कहाणी अण्णांनी मुलांना सांगितली. आठवीपर्यंत नापास न करण्याचे सरकारचे धोरण चुकीचे असून त्यामुळे शिक्षक घराकडे व घड्याळाकडे पाहून काम करतात असे ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेchildren's dayबालदिनprime ministerपंतप्रधान