पारनेर (जि. अहमदनगर) : देशभरातील माजी सैनिकांच्या ‘वन रँक वन पेन्शन’ व शहीद जवानाच्या पत्नीला निवृत्तीवेतन वाढून देण्याच्या मागणीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण करणार आहेत.अण्णांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचेही जाहीर केले आहे. अण्णा २ आॅक्टोबरपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करतील. माजी सैनिकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘युनायटेड फ्रंट एक्स सर्व्हिसमेन’ संघटनेने ‘वन रँक वन पेन्शन’साठी आंदोलन सुरु केले आहे. संघटनेचे प्रतिनिधी निवृत्त कर्नल वेदप्रकाश राठी, सचिव कर्नल दिनेश जैन यांच्यासह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींची बुधवारी राळेगणसिद्धीत बैठक झाली. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.अण्णा म्हणाले, .शेतकऱ्यांच्या जमिनीही बळकावण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. आधी जवानांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जुलैला दिल्लीला माजी सैनिकांतर्फे कारगिल विजय दिवस कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे. त्यात शहीद जवानांच्या पत्नींचा गौरव होणार आहे. माजी सैनिकांच्या प्रश्नावर देशभरात प्रत्येक राज्यात दोन रॅली व दौऱ्यांचा आराखडा जाहीर केला जाईल, असे हजारे यांनी स्पष्ट केले. रामलीला मैदानावरील आंदोलनात शेतकरी व जवान एकत्र झाले तर देशभरात चांगले संघटन उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही अत्यंत दुर्दैवी बाबजीवाची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना व शेतीच्या उत्पादनातून देशाच्या विकासात मोठा हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रातील सरकारकडून अन्याय होत आहे. हे दु:खदायक आहे.एकीकडे खासदारांना मोठ्या प्रमाणावर सवलती व पगार दिला जातो. तेव्हा सीमेवरील जवानांना ‘वन रँक वन पेन्शन’ मिळालीच पाहिजे. शहीद जवानांच्या वीरपत्नींची अवघ्या पाच हजार रूपयांच्या पेन्शनवर बोळवण केली जाते, ही दुर्दैवी बाब आहे
सरकारविरोधात अण्णांचे उपोषण
By admin | Published: July 16, 2015 4:07 AM