ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : कॉन्सिल ऑर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट अॅक्झामिनेशन बोर्डातर्फ़े घेतल्या गेलेल्या १०वी आणि १२वीच्या परिक्षेचा निकाल आज दुपारी ३ वाजता जाहीर झाला. दहावीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात आली होती. ८८,२०९ विद्यार्थी आणि ७०,६२६ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या परिक्षेतील उत्तीर्णेतेचे प्रमाण ९८.५४ टक्के होते. तो निकालही २०१५ च्या मे महिन्यात लागला होता. यंदाची निकालाची तारिखही आधी जाहीर करण्यात आली होती.
असा पहाल तुमचा निकाल :
- cisce.org, cisce.org/results आणि careers.cisce.org या वेबसाईटवर लॉगिंन करा
- त्यानंतर ICSE ClassX Results 2016 यावर क्लिक करा
- त्यानंतर आवश्यक ती माहिती भरा
- लगेच तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल.
SMS द्वारे -
- आपण SMS द्वारे देखील निकाल पाहू शकता. त्यासाठी ICSE – आपला UID क्रमांक 09248082883 यावर पाठवू शकतात.