मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या विविध १४ कॅटेगिरीतून विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाची घोषणा झाली असून, त्यात राजकारण, साहित्य, कला, नाट्य, वैद्यकीय, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे या वर्षीही ज्युरींच्या बैठकीत विचारांची जुगलबंदी रंगणार, हे निश्चित आहे.‘लोकमत’ ऐडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या वर्षीच्या ज्युरींमध्ये, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री आणि साहित्य, शिक्षण, राजकारण या विविध क्षेत्रांचा दांडगा अभ्यास असणारे प्रकाश जावडेकर, महाराष्टÑाच्या राजकारणात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करणारे, केंद्रात पंतप्रधान कार्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सदस्य आहेत.‘पद्मश्री’ पुरस्काराने नुकताच ज्यांचा सन्मान झाला असे, गडचिरोलीसारख्या भागात निष्ठेने अनेक वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, टाटा हॉस्पिटलमध्ये आपल्या प्रयोगशील कामांतून स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी खूप मोठे काम उभे करणारे पद्मश्रीडॉ. राजेंद्र बडवे आणि स्वत:च्या वैचारिक भाषणांनी वेगळा श्रोतावर्ग निर्माण करणारे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार तथा विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर हेही या ज्युरी मंडळात आहेत.जागतिक स्तरावर शेतीचे उत्पन्न अधिकाधिक वाढावे, यासाठी विविध सुविधा पुरविणारी प्रख्यात कंपनी यूपीएलचे कार्यकारी संचालक विक्रम श्रॉफ, वायकॉम १८ ग्रूप आणि कलर्स टीव्हीला वेगळी प्रतिमा निर्माण करून देणारे, टीव्हीच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख असणारे वायकॉम १८चे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक, सीएनएन न्यूज १८ नेटवर्कचे समूह संपादक तथा पत्रकारितेच्या माध्यमातून विविध गंभीर विषय हाताळणारे राहुल जोशी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाज मेमन यांचाही ज्युरी मंडळात समावेश आहे.आपल्या गाण्यांनी देशाला वेड लावणारे कवी, साहित्यिक आणि केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, ‘भिगें ओंठ तेरे’, ‘अगर तुम मिल जाओ’सारखी असंख्य लोकप्रिय गाणी देणारे संगीतकार अनू मलिक, संगीतक्षेत्रात मराठीची पताका अटकेपार नेणारे ‘नटरंग’, ‘सैराट’सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अजय - अतुल, ‘नटरंग’, ‘बीपी’, ‘न्यूड’ असे वेगवेगळे विषय चित्रपटांतून हाताळणारे नव्या पिढीचे चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निवेदिता सराफ अशी कलासक्त नावेही या वर्षीच्या ज्युरी मंडळात आहेत. चला तर मतदानाला प्रारंभ करा आणि मान्यवर ज्युरींसोबत आपणही ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार विजेत्यांच्या निवडीचा एक भाग बना.‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ निवड समिती सदस्य- प्रकाश जावडेकर,केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री- पृथ्वीराज चव्हाणमाजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य- पद्मश्री डॉ. अभय बंगज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गडचिरोली- पद्मश्रीडॉ. राजेंद्र बडवेआॅन्कोलॉजिस्ट, मुंबई- डॉ. भालचंद्र मुणगेकरमाजी खासदार,माजी कुलगुरू- विक्रम श्रॉफकार्यकारी संचालक,यूपीएल- विजय दर्डाअध्यक्षलोकमत मीडिया- प्रसून जोशीअध्यक्ष, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन- राज नायकसीईओ,कलर्स - वायकॉम 18- अनु मलिकसुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक- अजय गोगावलेसुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक- अतुल गोगावलेसुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक- राहुल जोशीन्यूज 18 नेटवर्क,समूह संपादक- रवी जाधवचित्रपट दिग्दर्शक- निवेदिता सराफज्येष्ठ मराठी अभिनेत्री- अयाज मेमनज्येष्ठ क्रीडा पत्रकार
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या तज्ज्ञ ज्युरी मंडळाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 5:14 AM