शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ स्पर्धेची घोषणा

By admin | Published: March 06, 2017 6:28 AM

महाराष्ट्र आणि गोव्यातील क्रमांक १चे दैनिक असलेल्या ‘लोकमत’तर्फे चौथ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार स्पर्धेची घोषणा करण्यात आली

मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील क्रमांक १चे दैनिक असलेल्या ‘लोकमत’तर्फे चौथ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मानासोबतच या क्षेत्रातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ प्रदान करीत असतो. यंदा या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या आधी या स्पर्धेचे परीक्षण पंडित जसराज, हरिहरन, कविता कृष्णमूर्र्ती, डी. एल. सुब्रमण्यम, शंकर महादेवन, पंडित हरिप्रसाद चौरसिया, प्रसून जोशी, शुभा मुद्गल, रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी केले आहे. यंदा स्पर्धेत एक नवीन अध्याय जुळला असून, प्रसिद्ध आणि चित्रपट अशा दोन ‘कॅटेगिरी’ असणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना आपले आॅडिओ आणि व्हिडीओ www.surjyotsna.org या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. विजेत्यांना एक लाख रुपये सन्मान निधी, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ हा असा मंच आहे, ज्याने अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबत संगीताचे क्षेत्र विस्तारण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मागच्या तीन वर्षांत या पुरस्काराने अवघ्या देशात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे हा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिला जातो. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना सन्मानजनक संधी उपलब्ध करून देणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश आहे. हा तर आमचा गौरवया स्पर्धेच्या परीक्षक मंडळात असलेले प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड या स्पर्धेबाबत म्हणाले, लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे परीक्षण करण्याची संधी आम्हाला मिळतेय हा आमचा गौरव आहे. तरुण आणि प्रतिभावंत संगीतकार-गायकांना प्रोत्साहन देणारा हा मंच आहे. संगीत हे भारतातील रचनात्मक अभिव्यक्तीचे प्राचीन असे रूप आहे. याच संगीताच्या माध्यमातून आम्ही देशभरातील नवीन प्रतिभांचा शोध घेऊन त्यांना एक सशक्त मंच प्रदान करणार आहोत. ऐतिहासिक प्रवासया स्पर्धेच्या दुसऱ्या परीक्षक सोनाली राठोड म्हणतात, या पुरस्काराचा प्रवास ऐतिहासिक असाच झाला आहे. मी या स्पर्धेचा एक भाग आहे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ही स्पर्धा संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांना एका मंचावर आणते. नवीन आव्हानांसोबत या स्पर्धेला चौथ्या वर्षात पदार्पण करताना पाहण्यास मी उत्सुक आहे. (प्रतिनिधी) नव्या प्रयोगासह नव्या प्रतिभांना समोर आणणारलोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा या पुरस्कार सोहळ्याबाबत म्हणाले, या पुरस्काराची मूळ कल्पनाच देशभरातील संगीत क्षेत्रातील नवीन प्रतिभांचा शोध घेणे ही आहे. तीन वर्षांआधी आम्ही हे स्वप्न पाहिले आणि आज या पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभांना मंच दिलाय आणि स्पर्धेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण केला आहे. यंदा आम्ही शास्त्रीय संगीतासोबतच ‘पॉप्युलर कॅटेगिरी’ या स्पर्धेत जोडली आहे आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन प्रवेशिका मागवत आहोत. स्पर्धेच्या या चौथ्या वर्षात एका नव्या प्रयोगासह आम्ही नव्या प्रतिभांना समोर आणण्यासाठी तत्पर आहोत.असे असेल स्पर्धेचे स्वरूपस्पर्धा १५ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी असेलwww.surjyotsna.org या संकेतस्थळावर झोननिहाय प्रवेशिका स्वीकारल्या जातील.अंतिम फेरीतील स्पर्धकांना नागपुरात २५ मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात लाईव्ह परफॉरमन्सची संधी दिली जाईल.>आॅनलाइन प्रवेशिका पाठविण्याची पद्धतजास्तीत जास्त पाच मिनिटे कालावधीची आपली प्रवेशिका आॅडिओ अथवा व्हिडीओ या कोणत्याही एका माध्यमात तयार करा. प्रवेशिका आॅनलाइन अपलोड करण्यासाठी www.surjyotsna.org या संकेतस्थळास भेट द्या. सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारासंबंधीची सर्व माहिती व्यवस्थित वाचा. प्रवेशिका अपलोड करण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा. व्यक्तिगत माहितीसह झोन निवडून ‘क्लासिकल’ अथवा ‘पॉप्युलर’पैकी एक प्रकार निश्चित करून आपली प्रवेशिका अपलोड करा. नियम व अटी चौकटीत क्लिक करा आणि सबमिट बटण दाबा. प्रवेशिका अपलोड करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०१७ अशी आहे. गायक रूपकुमार राठोड, गायिका सोनाली राठोड, संगीततज्ज्ञ शशी व्यास हे करतील स्पर्धेचे परीक्षणयापूर्वीचे मानकरी : गायिका : रिवा रूपकुमार राठोड (२०१४) गायक : अर्शद अली खान (२०१४) गायिका : पूजा गायतोंडे (२०१५) तबला वादक : ओजस अढिया (२०१५) गायिका : अंकिता जोशी (२०१६) बासरी वादक : एस. आकाश सतीश (२०१६)