मुंबई : १ लाख ७ हजार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ९ हजार कर्मचाऱ्यांनी बदल्यांसाठी विनंती अर्ज केल्याने आता कोणाकोणाच्या बदल्या करायच्या असा यक्ष प्रश्न पडलेल्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बदल्यांसंबंधीचे धोरणच जाहीर केले आहे. विनंती बदल्यांबाबत कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता व सेवाकाल विचारात घेण्यात येणार आहे. विनंती बदलीसाठी विभागातील रिक्त जागा विचारात घेण्यात येतील. विनंती बदल्यांबाबतची संख्या संबंधित विभागातील रिक्त जागांपेक्षा जास्त असल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवकालानुसार ज्येष्ठता यादी तयार करून त्यानुसार कर्मचाऱ्यांची विनंती बदली विचारात घेण्यात येईल. अशा बदल्या मे-जून आणि डिसेंबरमध्येच करण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीत/गंभीर आजाराची तीव्रता लक्षात घेऊन समायोचित बदल्या करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांना असतील, असे रावते यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) अटल पेन्शनकेंद्र सरकारद्वारे जाहीर केलेली अटल पेन्शन योजना परिवहन महामंडळातील पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे. तसेच, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येईल.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण जाहीर
By admin | Published: August 02, 2015 3:06 AM