शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 2:44 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा दि. १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.

पुणे, दि. 18 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा दि. १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने मंडळाकडून काही वर्षांपासून काही महिने आधीच परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. यंदाही मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येईल. हे वेळापत्रकच अंतिम असेल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा इतर सोशल मिडियावर व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.